श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा महोत्सवाचे बक्षीस वितरण नुकतेच पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी विद्यालयाचे शिक्षक-पालक प्रतिनिधी बेलापूर दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक सुधीर हापसे, संजय काळे, विशाल उपाध्ये, प्रतीक प्रधान, रुपाली पाटील, रोहिणी कुऱ्हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून स्व. रावसाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बास्केटबॉल असे सांघिक खेळ घेण्यात आले. तर १०० (शंभर) व २०० (दोनशे) मी. धावणे स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी ब्ल्यू हाऊस उत्कृष्ट हाऊस म्हणून घोषित करण्यात आला. तर मोठ्या गटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून संजिवनी गाडेकर व प्रतिक खंडागळे तसेच छोट्या गटात जान्हवी क्षीरसागर व गौरव ब्राम्हने या विद्यार्थ्यांना घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक (एनआयएस) कोच अजय आव्हाड, मयूर जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचे विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, व्हा.चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनीषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल पारखे, सूत्रसंचालन प्रीती नाणेकर, कोमल पारखे यांनी केले, तर आभार प्रीती नाणेकर यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
Post a Comment