होमगार्ड सप्ताह निमित्त माऊली वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम व फराळाचे वाटप

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 श्रीरामपूर शहरा लगत असलेले शिरसगांव येथील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी राहाता तालुका होमगार्ड पथकाच्या वतीने येथील आजी आजोबा तसेच शालेय विद्यार्थी यांच्यासाठी फराळाचे वाटप व स्वच्छता अभियान राबविण्यात आले,
 सदरचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक अहिल्यानगर श्री. प्रशांत खैरे साहेब तसेच मा. संजय शिवदे केंद्रनायक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम,वृक्षारोपण आदी सामाजाभिमूख उपक्रमे राबविण्यात आली.
 परंतु केंद्रनायक संजय शिवदे यांच्या विशेष सूचनेवरून अनाथ गरजू निराधार अशा व्यक्तीसाठी  मोहीम राबवून सेवा करण्याची संधी प्राप्त करावी यामुळे राहता होमगार्ड पथक यांच्या वतीने श्रीरामपूर परिसरातील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच वयोवृद्ध आजी आजोबा यांचे आशीर्वाद घेऊन मोहिम राबविण्यात आली, प्रसंगी राहाता तालुका समादेशक अधिकारी सर्वश्री संदीप शिंदे बाबासाहेब शेलार,प्रशांत भालेराव,अरुण पवार, शुभम अंभोरे ,गुंड पत्रकार राजेंद्र देसाई आदींनी यामध्ये सहभाग नोंदवला. आश्रमाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
आजी आजोबा तसेच शालेय विद्यार्थी यांना फराळाचे वाटप करण्यात आले,
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुभाष वाघुंडे, सौ. कल्पना वाघुंडे, दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर, संतोष भालेराव,श्री.जोशी आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केले तर आभार दत्तात्रेय खिलारी यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
 वडाळा महादेव 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा