खा.वाकचौरे यांना निवेदन !
येत्या दोन दिवसात कामगार मंत्री
यांचेशी चर्चा करणार - खा वाकचौरे
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या आदेशानुसार इपीएस ९५ पेन्शनवाढीसाठी देशातील सर्व खासदार यांचे घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे (शिर्डी ता..राहाता) येथील माझ्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी केले त्या सर्वांच्या प्रश्नाची जाणीव पूर्णपणे मला असून येत्या दोन दिवसात नवी दिल्ली येथे गेल्यावर केंद्रीय कामगार मंत्री मनसुखजी मांडवीया यांचेशी त्वरित चर्चा करणार आहे व हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल व दि. १० व ११ डिसेंबर रोजी रामलीला मैदान नवी दिल्ली येथे होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहे असे प्रतिपादन शिर्डी येथील खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवेदन स्वीकारल्यावर पेन्शनधारकांना त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले हा मुद्दा पहिल्याच अधिवेशनात मांडला आहे.दिल्ली येणाऱ्या पेन्शनधारकांना आरक्षण मिळणेसाठी त्यांना खासदार कोट्यातून रेल्वे आरक्षण देण्यासाठी पत्र देण्यात येईल म्हणजे गैरसोय होणार नाही तसेच सर्वांची राहण्याची व्यवस्था पण करता येईल. पेन्शनधारक अल्पशी पेन्शन घेऊन कसे जीवन जगत आहे त्याची जाणीव आहे.या दहा वर्षात तुम्हाला काहीच मिळाले नाही.हे सरकार का देत नाही हा सरकारचा आडमुठेपणा आहे.मी ४८ खासदारांना,पेन्शनर्स पदाधिकारी,पत्रकार यांना येथे बोलावणार आहे व पूर्ण शक्तीनिशी प्रश्न मांडून मार्गी लावला जाईल.वेगळी दिशा देऊन जास्तीत जास्त आवाज उठविला जाईल.हा प्रश्न तुमचा नसून माझा आहे असे समजतो.फायनान्स कमिटीची बैठक असेल त्यावेळी मी सभासद असल्याने त्यातही हा प्रश्न उपस्थित करेन असेही खा वाकचौरे यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातून अर्जुन जाधव,बी डी साळवे, अशोकराव देशमुख,सुभाष आरसुले,विनायक लोळगे, बापूराव बहिरट,बी आर चेडे,बबनराव शेट्ये,संपतराव पाडेसे,माणिकराव अस्वले, सुलेमानभाई शेख,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ,नवाज जहागीरदार, सुदेश कटारिया,डी एस पटारे,दत्तात्रय चौधरी, सावळेराम जाधव मुकुंद रणभोर,अशोक भुजबळ, अशोक मगर,मारुती, रामलखन,भागवत खंडीझोड,आदी पेन्शनधारक धरणे आंदोलनात सहभागी होते.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
إرسال تعليق