ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीचा तीसरा वार्षिक म्युझिकल उत्सव संपन्न

नगर - संगीतला भाषा नसते, परंतु ते आपण जेव्हा मन लावून ऐकतो तेव्हा प्रत्येकाला ते भावत असते. सुख-दु:खात मनाला प्रसन्नत्ता लाभते. ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत परिक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देत आहे. यातून संगीत संस्कृतीचे आदान-प्रदान होत असल्याने त्या माध्यमातून देश-विदेशातील संगीत जाणून घेण्याची संधी मिळते.ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे, असे विद्यार्थ्यांच्या पालकांना व नगरकरांना वाटते. 
नगरमधील ग्रेस म्युझिकल अ‍ॅकॅडमी च्या तीसया वार्षिक उत्सव संपन्न झाला. या म्युझिकल उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर करुणा शेंडे, ऑग्जिलियम कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका सिस्टर निलिमा रॉड्रिग्ज,सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नाँदिता डिसोझा, ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर, ग्रेस फाउंडेशनचे सेक्रेटरी लिओ पंडीत आदि उपस्थित होते.
प्रास्तविकात पिटर पंडित म्हणाले, ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी ही अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अ‍ॅकॅडमी आहे जी लंडन येथील ट्रिनिटी कॉलेजशी संलग्न आहे. अ‍ॅकॅडमीचा तीसरा वार्षिक म्युझिकल उत्सवात आंतरराष्ट्रीय संगीत परिक्षेतील 27 यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रिनिटी कॉलेज लंडनचे सर्टिफिकीट देऊन सन्मानित करण्यात आले. तर 50 विद्यार्थ्यांना अ‍ॅकॅडमीचे सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अ‍ॅकॅडमीत शिकलेल्या कलेचे उपस्थितांसमोर उत्कृष्टपणे सादरीकरण केले. मराठी-हिंदी-इंग्रजी गीतांच्या उत्कृष्ट सादरी करणाने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. 
सूत्रसंचालन विणा दिघे यांनी केले. तर आभार सौ.सोनाली पंडित यांनी मानले. 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा