पोलीस उपनिरीक्षक अमोल गोविंदराव पवार यांची नाशिक परीक्षेत्र येथे बदली

शेवगांव / प्रतिनिधी:
गेल्या दिड वर्षापासून शेवगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल गोविंदराव पवार यांची नुकतीच नाशिक परिक्षेत्र  येथे बदली झाली. शांत संयमी आणि मितभाषी असे व्यक्तिमत्त्व पवार यांचे होते. पीएसआय अमोल पवार यांचे कामकाज अत्यंत जवळून पाहिले सुरुवातीच्या काळामध्ये वैयक्तिक कौटुंबिक अडचणी असताना देखील वरिष्ठांनी सांगितलेल्या कुठल्याही कामाला नाही हा शब्द त्यांच्याकडून ऐकायला मिळाला नाही. दिलेले काम त्यांना जमेल किंवा नाही जमेल हा पुढचा विषय असायचा परंतु तात्काळ हो सर मी हे काम करतो असं बोलून कामाला सुरुवात करायचे. दरम्यानच्या कालखंडात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि प्रभारी अधिकाऱ्यानंतर  फक्त पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे एकमेव अधिकारी शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी राहिले. त्यावेळी प्रचंड कामाचा लोड आणि अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीचा निर्णय घेणे या गोष्टीला ते सामोरे गेले. याच दरम्यान अचानक दुःखाचा डोंगर देखील कोसळा वडील पोलीस विभागामध्ये कार्यरत होते परंतु दीर्घ आजारपणामुळे आजारी रजेवर होते.आणि या आजाराशी झुंज देत त्यांचे निधन झाले. त्यावेळी पवार साहेब  कर्तव्य बजावत होते आणि अशातच  साहेबांच्या बंधूंचा फोन आला  की  वडिलांचे निधन झाले. एक क्षण काही सुचत नव्हते तात्काळ अंत्यविधीसाठी साहेब पाचोर्‍याला रवाना झाले.यावेळी एका गोष्टीचे विशेष वाटले आपल्या वडिलांच्या अंतिम क्षणाला देखील साहेब उपस्थित राहू शकले नाही.तेव्हा समजले पोलीस विभाग असेल किंवा सेनादल असेल या ठिकाणी काम करत असताना आपले आई-वडील पत्नी मुलं मुली बहीण भाऊ सर्व नाते एका बाजूला ठेवून देशाची सेवा करावी लागते. शेवगाव पोलीस स्टेशन येथे काम करत असताना सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचा समन्वय  ठेवण्यात त्यांचा चांगलाच हातखंडा होता. शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटच्या घोटाळा संदर्भातील सर्वप्रथम आरोपीला अटक करण्यात साहेबांना यश आले आणि त्यापुढे अनेक आरोपी अटक होत गेले. तक्रारदार ज्यावेळेस पोलीस स्टेशनला येतो तर त्याच्याकडे आपुसकीने चौकशी करणारे पहिलेच अधिकारी मी बघितले.पोलीस खात्यात अधिकारी म्हटलं  की प्रचंड ताण-तणाव आणि  प्रचंड रागवा रागव, आरडा ओरडा, ही परिस्थिती बघायला मिळाली परंतु डोक्यावर बर्फ आणि हातात साखर ठेवून काम करणारे पहिलेच अधिकारी प्रथमच पोलीस स्टेशनला लाभले. पोलिसांशी मैत्री म्हटलं की *हौशे नऊशे गावशे* असे सगळेच अधिकाऱ्यांच्या अवतीभवती फिरत असतात. परंतु या सर्व लोकांना साहेबांनी कल्पना दिली होती. की कायदा हा सर्वांना समान आहे कितीही जवळचा मित्र असला आणि कायद्याने तो गुन्हेगार असेल तर मी त्याला कायद्याच्या चौकटीतच उभे करणार. 

*शेवगाव पोलीस स्टेशन येथे परि. आयपीएस अधिकारी बी.चंद्रकांत रेड्डी,उपविभागीय पोलीस अधीकारी सुनिल पाटील पोलिस निरीक्षक विलास पुजारी,पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे पोलीस निरीक्षक समाधान नागरे सह. पोलीस निरीक्षक दिपक सरोदे सह. पोलीस निरीक्षक आशिष शेळके सह.पोलीस निरीक्षक प्रशांत कांढरे सह.पोलीस निरीक्षक अनिल बागुल सह. पोलीस निरीक्षक महेश माळी सह. पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे, पोलीस निरीक्षक नीरज बोकील पोलीस निरीक्षक विशाल लहाणे इत्यादी अधिकाऱ्यांसोबत अमोल पवार यांना  शेवगाव पोलीस स्टेशनला असताना काम करण्याची संधी मिळाली*
आशा कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर पोलीस अधिकाऱ्यास मानाचा मुजरा
*वृत्त विशेष सहयोग*
प्रा.अजय नजन (सर) शेवगांव 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा