प्रभाग क्रमांक-27 कोंढवा-खुर्द-मिठानगर प्रभागातील विविध प्रलंबित कामासंदर्भात हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मा.नगरसेवक गफूर पठाण यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले.यामध्ये प्रामुख्याने कोंढवा परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता शिवनेरी नगर डी.पी.रोड लवकरात-लवकर विकसित करण्यात यावा तसेच विकसित करण्यात आलेला रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावी याची मागणी करण्यात आली याबरोबरच पावसाळ्यानंतर प्रभागातील खराब झालेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही व प्रभागाला पाणी देखील वाढवुन मिळावेत अशी आग्रहाची मागणी गफूर पठाण यांच्या वतीने करण्यात आली.
Post a Comment