प्रा. डॉ. प्रदीप शिंदे यांना महात्मा फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

सातारा / प्रतिनिधी:
 येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजचे हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.प्रदीप शिंदे  यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बामसेफचे राष्ट्रीय नेते सन्मानीय वामन मेश्राम यांच्या हस्ते  राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे  राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे घेण्यात आले होते. फुले आंबेडकरी विचार व चळवळीमध्ये  वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक, बौद्धिक सहयोग डॉ.प्रदीप शिंदे देत असतात. त्यांचे कविता लेखन हे पुरोगामी विचारांचे प्रसारण करते. तसेच सामाजिक न्यायाच्या चळवळीत ज्यांनी योगदान दिले त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करते. त्यांनी महात्मा फुले ,बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज , कर्मवीर भाऊराव पाटील, तथागत गौतम बुद्ध या महामानवाविषयी कविता लेखन तर केले आहेच पण आपल्या वक्तृत्वाने या विषयावर बहुजनांना जागृत केले आहे. ते बहुजन समाजातील विविध गरीब ,अनाथ,मतीमंद  यांचेसाठी काम करणाऱ्या संस्थाना मदत करतात.  समाजात सद्य स्थितीत चाललेल्या विषमता, अंधश्रद्धा ,तसेच राजकारणातील अनैतिकता यावर  चिंतन करून  वैज्ञानिक दृष्टीकोन व नितीमत्ता विषयक उपदेश करत असतात. तसेच भारतीय संविधानाचा विचार आपल्या वाणीद्वारे व लेखनाद्वारे सर्वत्र पोचवतात. संविधानिक मुल्यानुसार आचरण व वर्तन करून समाजाला योग्य दिशा , चांगला मार्ग ते दाखवत असतात. बहुजन हितवादी सम्यक दृष्टी असलेले  विचार प्रसारण ते आवर्जून करतात. या नि यासारख्या अनेक चांगल्या कृतींचा विचार करून  प्रोटान  ने त्यांची निवड केली होती. या कार्याबद्दल गौरव चिन्ह व सन्मानपत्र प्रदान  देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रोटान चे सर्व पदाधिकारी यांनी त्यांना भावी सामाजिक, शैक्षणिक कार्यास व वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. प्रदीप शिंदे यांनी नवीन बामसेफ चे राष्ट्रीय नेते वामन मेश्राम यांच्याशी नवीन शैक्षणिक धोरण व त्या मध्ये नेमकेपणाने शिक्षकांची विद्यार्थी, पालकांची भूमिका काय असावी या बाबत चर्चा केली. नागपूर येथील या बामसेफच्या अधिवेशन कार्यक्रमास संपूर्ण राज्यातून प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते. या विशेष समारंभात आयु. सतीश गायकवाड सर अध्यक्ष प्रोटान सातारा व डॉ. केशव पवार हे ही  उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, तसेच प्राध्यापक स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा