श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक व त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नाडी परीक्षण व अष्टविद परीक्षेसह या शिबिरात मध्ये आज शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला,यामध्ये आयुर्वेदाचार्य डॉक्टर सोनाली खर्डे व डॉ.प्रीतम गोरडे यांनी पेशंटची नाडी परीक्षण करून मार्गदर्शन व आहार विषयक सल्ला मार्गदर्शन व उपचार दिले.
सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री आयुर्वेद हर्बल कॉस्मेटिक च्या संचालिका सौ.सोनल संदीप त्र्यंबके व श्री. संदीप त्र्यंबके त्याचबरोबर त्यांचे सहकारी महादेव ओहोळ, सुभाष कुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बोलताना श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिकच्या संचालिका सौ. सोनल संदीप त्र्यंबके यांनी सांगितले की,वेळोवेळी आमच्या संस्थेच्या माध्यमातून लोकहित उपयोगी असेच अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. त्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना नक्कीच फायदा होईल. आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणे व येणाऱ्या काळामध्ये संस्कार शम्यं व निरोगी सुदृढ पिढी घडवणे हेच आमचे ध्येय असेल त्यासाठी श्री आयुर्वेद व हरबल कॉस्मेटिक असे अनेक उपक्रम आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी राबवत राहील असेही त्या म्हणाल्या.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
Post a Comment