बाळ येशू जन्म देखाव्यातून ख्रिस्ती समाजाने दिला शांती व प्रितीचा संदेश

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दरवर्षी प्रमाणे नाताळ निमित्त शहरातून सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने बाळ येशूच्या जन्म देखाव्याची मिरवणूक काढण्यात आली.
 मंगल दुशिंग यांनी केलेल्या प्रार्थनेनंतर या मिरवणुकीस संत लोयोला चर्चपासून सुरूवात कऱण्यात आली. सदर कॅण्डल सर्विस मिरवणूक पुढे सिद्धार्थनगर, भुयारीपूल मार्गे बस स्टॅन्ड, मेन रोड , छत्रपती शिवाजी महाराज रोड , दशमेश नगर, कर्मवीर पुतळा मार्गे पुन्हा चर्चकडे आली. दरम्यान लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश भालेराव, फा.जेकब गायकवाड, ईम्यानुएल चर्चचे पा.अण्णासाहेब अमोलिक, पा.अलिशा आमोलिक, बेथेल चर्चचे पा. सतीश आल्हाट, सिस्टर नलिनी आल्हाट, न्यू होप चर्चचे पा. रावसाहेब त्रिभुवन, पा. सातदिवे , पा.दिपक शेळके, तसेच झेवियर्सचे शिक्षक रविन्द्र त्रिभुवन यांनी ख्रिस्त जन्माबाबत शहरवासियांना सुवार्ता संदेश देऊन नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
 मिरवणूक शहरात पोहचताच अनेक सामाजिक व राजकीय मान्यवरांनी उपस्थित धर्मगुरूंचा सत्कार केला.
याप्रसंगी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, माजी आमदार बी.के.मुरकुटे, साई संस्थानचे मा.विश्वस्त सचिन गुजर, अ.नगर जिल्हा बॅकेचे संचालक करण ससाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लकी सेठी, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक थोरे, संजय आगाशे,
माजी नगरसेवक प्रकाश  ढोकणे, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, सनी सानप, भाजपा सरचिटणीस रुपेश हरकल, माजी नगरसेवक राजेश अलग आदींनी ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
तसेच रितेश एडके, महेंद्र जावळे, किशोर कंत्रोड, संतोष आढागळे, निलेश ओझा, मनोज भोसले व अनेकांनी शाल ,बुके व गुलाबपुष्प देवुन धर्मगुंरूचे स्वागत केले. यावेळी कमलाकर पंडित व मंगल दुशिंग यांनी सुत्रसंचलन केले. मिरवणूक यशस्वी होणेकामी लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश भालेराव, फा.विक्रम शिणगारे ,फा. अनिल चक्रनारायण, पा. अण्णासाहेब अमोलिक, पा.सतीश आल्हाट, पा. दिपक शेळके, पा.सातदिवे, कमलाकर पंडित,विजय त्रिभुवन, लाजरस गायकवाड, जॉन धीवर, डॅनियल साळवे, लुकस दिवे, ललित गायकवाड, संदीप साळवे, प्रवीण सात्राळकर, रविन्द्र त्रिभुवन तसेच महिला प्रतिनिधी  लता बनसोडे, बेनिग्ना पवार, सुवर्णा बोधक, मंगल दुशिंग, विजया दळवी, संगीता पंडित, युथ ग्रुप, नाताळ उत्सव समिती, महिला मंडळ, कनोसा सिस्टर्स व सेंट लुक हॉस्पिटलच्या सिस्टर्स आदींनी परीश्रम घेतले या सर्वांचे कमलाकर पंडित यांनी आभार मानले व फा. प्रकाश भालेराव यांनी केलेल्या शेवटच्या प्रार्थनेने सदर मिरवणुकीची सांगता केली.
*वृत्त विशेष सहयोग*
रवि त्रिभुवन (सर) श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा