गाईडचे महत्त्व अनन्यसाधारण - ज्ञानदेव पांडुळे

भिंगार: स्काऊट गाईडमुळे आपल्याला शिस्त लागते व आपण स्वावलंबी होतो दुसऱ्यांचा आदर करतो .संपत्ती ही श्रमातून निर्माण होते पैशातून नव्हे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी केले. 
श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल भिंगार येथे स्काऊट गाईड कॅम्पचे आयोजन करण्यात आलं होते. सर्वप्रथम ज्ञानदेव पांडुळे, आयबीएन लोकमतचे साहेबराव कोकणे, स्काऊट मास्टर श्री हजारे सर, रयतचे उत्तर विभागीय अधिकारी तथा शाळेचे प्राचार्य प्रमोद तोरणे , मुख्याध्यापक नारायण अनभुले या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये प्रमोद तोरणे यांनी गाईड कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या चारही संघांचे अभिनंदन करत श्रमाचे आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर स्काऊटचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांची माहिती दिली .साहेबराव कोकणे यांनी शिक्षकांचा आदर करून मने जिंकायची सांगितली त्याचबरोबर स्काऊट मास्टर श्री हजारे  यांनी गाईड  विषयी मार्गदर्शन केले. 
या कॅम्प मध्ये सहभागी झालेले विद्यार्थ्यांच्या चारही संघां मध्ये तंबू सजावट स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,  चूल पेटवून खाद्यपदार्थ स्पर्धा,शेकोटी पेटून नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांति घायतडक व आकांक्षा पडदुणे यांनी केले तर आभार संदीप अस्वर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी स्काऊटचे सोनवणे सर गाईडच्या जाधव मॅडम आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा