इस्त्रायलने १९६७पासून
बळकावलेला पॅलेस्टिनी भूभाग सोडावा, अशी मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले. यामध्ये इस्रायलच्या ताब्यातील पूर्व जेरुसलेमचाही भाग आहे. ठरावात पश्चिम आशियामध्ये सर्वसमावेशक आणि दीर्घ काळ शांततेसाठी आवाहनही केले आहे.
'पॅलेस्टाइनच्या समस्येचे शांततापूर्ण निवारण' असे या
ठरावाचे नाव असून, सेनेगलने हा ठराव मांडला. भारतासह १५७ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, इस्रायल आणि अमेरिकेसह आठ देशांनी ठरावाच्या विरुद्ध मतदान केले. या ठरावानुसार, इस्रायलने पूर्व जेरुसलेमसह १९६७ पासून बळकावलेला पॅलेस्टिनी भूभाग सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पॅलेस्टिनी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या हक्कांची, स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वाच्या हक्काची जाणीव इस्रायलला व्हावी, असेही म्हटले आहे.
إرسال تعليق