वाहन चालवितांना नियम व अटींचे पालन केल्यास विनाअपघात प्रवास होईल सुखकर - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांचे प्रतिपादन

वाहन चालवितांना नियम व अटींचे पालन केल्यास विनाअपघात प्रवास होईल सुखकर

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 
अनंता जोशी यांचे प्रतिपादन

शौकतभाई शेख / श्रीरामपूर
दुचाकी चालवितांना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालवितांना नेहमी सीटबेल्टचा वापर करावा. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यास नि:संकोच मनाने मदत करावी. तुमची छोटीसी मदत कोणाचा जीव वाचवू शकते. तसेच वाहनाने प्रवास करतांना नियम व अटींचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले.
        अशोक शैक्षणिक संकुलाचे संस्थापक माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अधिपत्याखालील अशोक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स, प्रगतीनगर येथे तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवचे (स्पोर्टमीट) उद्घाटन श्री.जोशी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी श्री.जोशी यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी, वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षा, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, मोबाईल मुक्त विद्यार्थी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 
       याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना सौ.मंजुश्रीताई मुरकुटे म्हणाल्या की, अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी अशोक शैक्षणिक संकुलाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, आयटीआय, इंग्लिश मीडियम स्कुल, सीबीएससी इत्यादी अभ्यासक्रम सुरू केलेले आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना देशी विदेशी खेळाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून भव्य क्रीडांगण उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन नावलौकिक मिळवावा, अशी अपेक्षा व्यक्त करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 
         प्रारंभी स्कूलचे संगीत शिक्षक सॅम्युअल वडागळे व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्फूर्ती गीताने मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संपत देसाई यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय शिक्षिका लक्ष्मी गोल्हार यांनी केला. या कार्यक्रम प्रसंगी शिवाजी हाऊस, नेताजी हाऊस, सावरकर हाऊस व भगतसिंग हाऊस पथकाचे शानदार संचालन झाले. त्यानंतर विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर केले. मशाल पेटवून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. स्कुलचे ए.इ.एम.एस. अद्याक्षरे असलेले फुगे हवेत सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नीरज मुरकुटे, सतिश ढाकणे आदी उपस्थित होते. शेवटी  शिक्षिका रंजना क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर क्रीडा स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी  सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा