अहमदनगर - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई नंबर चार च्या शिक्षिका ज्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे नाजेमा बेगम नवाब शेख यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे हा सोहळा पार पडला. याप्रसंगी रावसाहेब रोहकले, आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे, सुरेश निवडुंगे, प्रवीण ठुबे, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई झरेकर, संगीता कुरकुटे, उज्वला वासाल, स्वाती गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाजेमा शेख म्हणाल्या की कामाचे कौतुक झाल्यावर अजून जोमाने काम करायला बळ मिळते. काम करताना समाजातून सहकार्य मिळाल्यास भविष्यात पण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. नाजेमा शेख यांना नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद, मखदूम सोसायटी व समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
إرسال تعليق