मुस्लीम असण पाप गुन्हा वाईट नाहीये,आणि हो, हे सांगण्याची जबाबदारी मुस्लिमांची नाहीये, तर तुमची आमची सगळ्यांची आहे - आनंद शितोळे

कथित बहिष्कार मोहिमेच्या निमित्ताने.

देशातल्या नेत्याने किंवा देशातल्या अधिकारपदावर मुस्लिमाने असणे गुन्हा आहे का ? 
जन्माने मुस्लीम असणेच मुळात गुन्हा आहे का ? 
मुस्लीम असण एवढ घृणास्पद आहे का ? 

माठ आणि मंदबुद्धी चांगले मुस्लीम आणि वाईट मुस्लीम अशी विभागणी सांगायला येतीलच. 

मुळात चांगला आणि वाईट मुस्लीम ठरवणार कोण ? 
याचे अधिकार नेमके कुणी कुणाला दिलेत ? 

देशातल्या प्रचलित कायद्यांनी वागणारां नागरिक चांगला आणि न वागणारा वाईट हि साधी मांडणी लक्षात घेतली तर मग चांगला वाईट हे हिंदुना तेवढच लागू होत आणि सगळ्या धर्मियांना लागू होत. 

मग नेमके कोणते मुस्लीम चांगले आणि कोणते वाईट ? 

भाजपमध्ये असणारे शहानवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी , जम्मू मधला खालिद चांगले मुस्लीम आणि नवाब मलिक वाईट का ? 

मुळात चांगल वाईट ठरवण्याचा मक्ता आणि अधिकार संघाला दिलाय कुणी ? कि मुस्लीम मंचाला हा अधिकार दिलाय कुणी ? 

राष्ट्रभक्ती, राष्ट्द्रोही, चांगला मुस्लीम, वाईट मुस्लीम हे सगळे प्रमाणपत्र वाटण्याचा ठेका संघ आणि भाजप स्वतःकडे का घेतो ? 

भ्रष्ट्राचार करणारे, खून करणारे, गोळ्या घालणारे, अतिरेकी कारवाया करणारे, हेरगिरी करणारे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तर सगळ्याच धर्मातले आहेत , वेळोवेळी हे सिद्ध झालेलं आहे. पाकिस्तान ला गुपित विकणारा कुरुलकर कोण आहे ? संघाचा कार्यकर्ता ना ?

स्त्रियांना अश्लील धमक्या देणारे, खुनाच्या, बलात्कार करण्याच्या धमक्या देणारे, हेट स्पीच सातत्याने करणारे नेमके कुठल्या संस्कारी धर्माचे आहेत हेही वारंवार सिद्ध झालेलं आहेच कि. 

सरसकट सगळेच हिंदू चांगले नसतील तर सरसकट सगळे मुस्लीम वाईट नसणारच कि ? 

बर सरसकटीकरण करायचच ठरल तर मग या लोकांच नेमक काय करायचं ? 

दिलीपकुमार , मधुबाला, नर्गिस आणि अनंत मुस्लीम कलाकारांचे सिनेमे पहायचे नाहीत कि त्यांच्या तोंडावर काही कापड वगैरे टाकून झाकायच ? 

रफी , तलत मेहमूद , नौशाद, शकील यांची गाणी ऐकायची नाहीत कि कानात बोळे घालून घ्यायचेत ? 

झाकीर हुसेन, अल्लारख्खा यांचे तबले फोडायचे कि विलायत खा ची सतार तोडायची कि बिस्मिल्ला खान ची शहनाई गंगेत टाकायची कि बडे गुलामअली खां अडगळीत टाकून द्यायचे ? 

मुस्लीम लेखक, कलाकार,गायक,चित्रकार यांच योगदान सरसकट नाकारायच का फक्त जन्माने मुस्लीम आहेत म्हणून ? 

ज्या ज्या गावांत आमिरखान च्या पाणी फाउंडेशन न काम केलेले आहे त्या गावातले बंधारे ताली तलाव फोडून टाकायचे का ?

अझीम प्रेमजीनी उभारलेल्या न्यासाच्या माध्यमातून हजारो मुलांना शिक्षण दिलं जात ते बंद करायचं का ?

मुसलमान असण घृणास्पद आणि वाईट असेल तर तुमच्या आयुष्यात समोर येणाऱ्या प्रत्येक मुसलमान व्यक्तीला तुम्ही अशीच वागणूक देणार आहात का ? 

सभ्य लोकहो, 

यापुढे कुणीही कुठल्याही प्रकरणात अमका मुस्लीम आहे अस म्हटल्यावर तो मुस्लीम आहे कि नाही यापेक्षा त्यान केलेलं कृत्य अयोग्य कि योग्य याची चर्चा करा. 

मुस्लीम आहे म्हणजे वाईट आहे, घृणास्पद आहे हा विषय डोक्यातून काढून टाका. 

मुस्लीम असण पाप ,गुन्हा, वाईट नाहीये,आणि हो , हे सांगण्याची जबाबदारी मुस्लिमांची नाहीये, तर तुमची आमची सगळ्यांची आहे.

आनंद शितोळे 

#रविवारची_पोस्ट 

#आयडिया_ऑफ_इंडिया 

#लोकशाहीची_बखर

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा