आज बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ जागतिक पुस्तक दिन क जे सोमय्या हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन संस्कृती जपणे व वाचनाची चळवळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. पुस्तके आपले आयुष्य समृद्ध करतात आपल्याला अनेक अनुभव देतात तसेच जीवन जगण्याचे सूत्र हे पुस्तकातच लपलेले असते ते शोधण्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांचे नियमित वाचन करावे असे आवाहन विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड यांनी केले . तर पुस्तके जेथे असतील तेथे स्वर्ग निर्माण होतो म्हणून पुस्तकांचे नेहमी स्वागत करा पुस्तकांना जपा असे विचार ज्युनिअर कॉलेज विभागाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश धोंडलकर यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गोपाळे सर, पर्यवेक्षक श्री.लकडे सर, स्कूल कमिटी सदस्य किशोर फुणगे, उमेश तांबडे, प्रशासन अधिकारी श्री. कांबळे सर्व शिक्षक, शिक्षिका सेवकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
Post a Comment