फातिमा सय्यद चे पुन्हा षटकारावर षटकार
श्रीरामपूर - बेलापूर उर्दू शाळेतील विद्यार्थिनी कुमारी फातेमा अझरुद्दीन सय्यद इयत्ता सातवी याने मंथन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. ती महाराष्ट्रात 35 व्या क्रमांकाने तर जिल्ह्यात 22 तसेच श्रीरामपूर तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिचे या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी तसेच मुख्याध्यापक इमाम सय्यद, यास्मिन बाजी, नाजेमा खान, जमीर सर, मतीन सर, तबसूम बाजी, आजरा बाजी, जुलेखा बाजी यांनी फातेमा सय्यद चे अभिनंदन केले. तिचा पुष्पगुच्छ देऊन व विशेष सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. फातिमा ही शायर शाकीर सर व बिस्मिल्ला बाजी यांची भाची आहे. तसेच तिचे आई-वडिलांचेही अभिनंदन करण्यात आले.
Post a Comment