बेलापूर उर्दू शाळेतील विद्यार्थिनी कुमारी फातेमा अझरुद्दीन सय्यद याचे मंथन परीक्षेत धवधवीत यश

बेलापूर उर्दू शाळेतील  विद्यार्थिनी कुमारी फातेमा अझरुद्दीन सय्यद याचे मंथन परीक्षेत  घवघवीत यश

फातिमा सय्यद चे पुन्हा षटकारावर षटकार

श्रीरामपूर - बेलापूर उर्दू शाळेतील  विद्यार्थिनी कुमारी फातेमा अझरुद्दीन सय्यद इयत्ता सातवी याने मंथन परीक्षेत  घवघवीत यश संपादन केले. ती महाराष्ट्रात 35 व्या क्रमांकाने तर जिल्ह्यात 22 तसेच श्रीरामपूर तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिचे या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी तसेच मुख्याध्यापक इमाम सय्यद, यास्मिन बाजी, नाजेमा खान, जमीर सर, मतीन सर, तबसूम बाजी, आजरा बाजी, जुलेखा बाजी यांनी फातेमा सय्यद चे अभिनंदन केले. तिचा पुष्पगुच्छ देऊन व विशेष सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. फातिमा ही शायर शाकीर सर व बिस्मिल्ला बाजी यांची भाची आहे. तसेच तिचे आई-वडिलांचेही अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा