नाईंटीस् च्या गोल्डन इरा मधुर गीतांच्या महफिलचे रविवारी आयोजन... 40 वाजवणाऱ्या बरोबर नगर मध्ये प्रथमच मोठी संगीत मेजवानी

नगर - नगर मधील संगीतप्रेमीं रसिकश्रोत्यां साठी सुमधुर गाण्यांची महफिल डॉ. दमन काशीद (पाटील), महेश घावटे व निलेश महाजन प्रस्तुत "90 गोल्डन इरा" मध्ये कुमार सानू, उदित नारायण, अलका याग्निक, सोनू निगम, अनुराधा पौडवाल यांच्या नवाजलेल्या रोमांटिक गीतांची मैफिलीचे रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता स्टेशन रोड येथील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याचे नगरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ.दमन काशीद यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात डॉ. दमण काशीद, डॉ. गायत्री कुलकर्णी, निलेश महाजन, महेश घावटे, प्रतिभा साबळे, पूजा गडकरी, सारिका रघुवंशी, सुशील देठे, सचिन चंदनशिवे आदि गीते सादर करणार असून दहा प्रोफेशनल गायक कोरस देणार आहे. सहा डांसर असून उत्तम सूत्रसंचालन असणार आहे. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी असल्याकारणाने श्रोत्यांसाठी चहा नाश्त्याची ही मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. दमण काशीद यांनी सांगितले.
प्रथमच नगरमध्ये असा शो होत आहे ज्यामध्ये गीतांना संगीत देण्यासाठी 40 संगीत वाजविणारे असणार आहे. ज्यामध्ये ऑक्टोपॅड, रिदम, तबला, साईड रिदम, पर्शियानिस्ट, कीबोर्ड, सेक्सोफोन, फ्लूट, सितार, गिटार, लीड गिटार, बेस गिटार, ब्रास सेक्शन, ट्रम्प पॅड, व्हायलंस साठी आठ कलाकार, गिटार कॉर्डिनेशन ग्रुप मध्ये आठ महिला कलाकार आदी वाजंत्रीचे या शोमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. 
हा शो सर्वांसाठी मोफत आहे. पण प्रवेशिका अनिवार्य आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर माने यांना ८९५६३६३६६८ यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन डॉ. दमण काशीद यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा