पोटाचा धर्म भूक , भुकेचा धर्म पैसा , पैशाचा धर्म पैसा

पोटाचा धर्म भूक , भुकेचा धर्म पैसा , पैशाचा धर्म पैसा 

उपवासाला लागणारी फळ उत्पादन करणारे शेतकरी बहुसंख्येने हिंदू आहेत.
फळबागांचे मालक , फळबागेत काम करणारे शेतमजूर, वाहतूक करणारे वाहन व्यवसायिक, खत औषध बियाण विकणारे हिंदू मुस्लीम दोन्ही आहेत. 

फळांचा व्यापार करणारे बहुतांशी बागवान समाजाचे मुस्लीम आहेत. 

त्यांच्याकडून घाऊक फळ विकत घेऊन रस्त्यावर किरकोळ फळ विकणारे पथारी, हातगाडी , फेरीवाले हिंदू मुस्लीम दोन्ही आहेत. 

उपवासाला फळ विकत घेणारे हिंदू आहेत तसेच रमजान महिन्यात फळ विकत घेणारे मुस्लीम आहेत. 

तुम्ही मुस्लिमांची फळ विकत घेत नसाल तर ग्रामीण हिंदू शेतकऱ्याच्या पोटावर पाय देताय. 

पोल्ट्री व्यवसाय करणारे बहुसंख्य हिंदू आहेत.

आपापल्या दुकानात अंडी ठेवणारे हिंदू मुस्लीम सगळे आहेत आणि मटणाच्या दुकानात अंडी विकायला ठेवणारे मुस्लीम आहेत. 

शेळी मेंढी पालन करणारे पशुपालक हिंदू आहेत, हिंदू शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन करतात, 
बकरी ईदच्या काळात बोकड विक्री चांगली होते, आलेल्या पैशातून शेतकरी बियाणे ,खत खरेदी करतात, पेरणीला हेच पैसे उपयोगी पडतात. 

नाताळ मध्ये केकला मोठी मागणी असते. 
बेकरी धंद्यात पूर्वी प्रामुख्याने मुस्लीम कारागीर होते आता अन्यधर्मीय सुद्धा आहेत.
नाताळ मध्ये केकची मागणी ख्रिश्चन समाजाकडून येते. 

नाताळ-आषाढी-बकरी ईद हि प्रातिनिधिक उदाहरण,
कुठल्याही धर्माच्या सणाला बाजारात होणारी उलाढाल आणि पैसा सगळ्याच्या हातात खेळतो.

पैशाला , धंद्याला धर्म नसतो, जात नसते, पैशाचा धर्म फक्त पैसा. 

लोकसंख्येचा हिशोब बघितला ७५ टक्के हिंदू लोकसंख्या आणि २० टक्क्याच्या आसपास असलेली मुस्लीम लोकसंख्या. 

मांसाहारी मुस्लिमांच्या पेक्षा संख्येने मांसाहारी हिंदू संख्येने जास्त भरतील. 

ग्रामीण अर्थकारण एकमेकांच्या सहकार्याने चालत. 

बागवान हिंदूची फळे विकायची नाही म्हणाले तर उपाशी मरतील. 

हिंदू शेतकरी फळ बागवान व्यापाऱ्याला द्यायची नाहीत म्हणाले तर फळ नासून सगळाच नाश होईल. 

हिंदू शेतकरी कुर्बानीला बकर विकायचं नाही म्हटले तर एवढे बोकड कुठ पोसायचे आणि काय करायचे या चिंतेने मरून जातील. 

कुर्बानीला हिंदू शेतकऱ्यांच्या बोकडाची कुर्बानी द्यायची नाही अस मुस्लीम म्हणाले तर बकरी ईद साजरी होणारच नाही. 

छोट गाव, तालुका, शहर, जिल्हा ,राज्य, देश काहीही घ्या, अर्थकारण एकमेकांच्या हातात हात घालून चालले तरच सुरळीत चालते. 

ज्यांची पोट बिनकष्टाने , बापाच्या आयत्या पैशावर भरलेली आहेत त्यांच्या ढुंगणात हे आर्थिक बहिष्कार घालण्याचे येडे किडे वळवळ करतात. 

बहुजनांनी या आर्थिक बहिष्काराच्या खेळाच्या नादी लागणे म्हणजे ग्रामीण अर्थकारणावर कुऱ्हाड चालवणे. 

शेतीचे प्रश्न आधीच गंभीर झालेले आहेत, महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या करत असताना हे बिनडोक खेळ खेळणे म्हणजे आपणच शेतकऱ्यांच्या मातीला कारणीभूत होणे. 

शहाण्या लोकांनी या मठ्ठ आणि बेअक्कल लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रपंचाकडे लक्ष देणे आणि व्यवसाय व्यापार यामध्ये धर्म जात न आणणे हेच योग्य आहे.

आनंद शितोळे 

#सीधी_बात 

#आपल्या_खांद्यावर_आपलेच_डोके

#पैशाचा_धर्म

#आम्ही_भारताचे_लोक

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा