बांगलादेश , पाकिस्तान एकत्रित करून अखंड भारत पुन्हा निर्माण झाला तर काय होईल ?

अखंड भारताच्या पिचक्या पिपाण्या.

समजा भक्तांच्या म्हणण्यानुसार बांगलादेश , पाकिस्तान एकत्रित करून अखंड भारत पुन्हा निर्माण झाला तर काय होईल ? 

भारताची लोकसंख्या १३९ कोटी, पाकिस्तानची २२.५० कोटी आणि बांगलादेश १६.६३ कोटी. 

भारतात ५४३ खासदार आहेत, म्हणजे २५ लाख लोकसंख्येला एक खासदार. 

पाकिस्तानचे खासदार होतील ९० आणि बांगलादेश चे खासदार होतील ६६. 

एकूण खासदारांची संख्या ६९९ , म्हणजे स्पष्ट बहुमताला किमान ३५० खासदार लागणार. 

आता भाजपचे सध्याचे खासदार किती आहेत याचा हिशोब लावा आणि मग नव्या लोकसभेत कुणाच बहुमत राहील आणि कोण विरोधी पक्षनेता राहील याचा विचार करा. 

शिवाय या १७८ कोटी लोकांची पोट भरायची हि जबाबदारी सरकारची असेल. 

मग आपल्याला बांगलादेश आणि पाकिस्तानची भूमी, नैसर्गिक साधन, खनिज,बंदर, संपत्ती हवीय पण तिथली लोक नकोत अस आहे का ? 

मग हि ४० कोटी लोक कुठ धाडायची ? 

श्रीलंकेत कि अफगाणिस्थान मध्ये कि चीन मध्ये कि नेपाळ मध्ये कि थेट रशियात ? 

या ४० कोटी लोकांच स्थलांतर करायला लागणारा पैसा, यंत्रणा ,साधन, वाहने यांचा खर्च किती ? 
आणि हि लोक सुखासुखी जातील ? 
परागंदा होतील ? 

आपल्याच सरकारच्या अत्याचाराने पिडीत झालेले शरणार्थी जेव्हा लाखोंच्या संख्येने भारतात घुसायला लागले तेव्हा इंदिरा गांधीना कठोर पावल उचलून बांगलादेश निर्मिती करावी लागली. 

४० कोटी लोकांच तुम्ही नेमक काय करणार हा प्रश्न आधी सोडवायला लागणारे आणि मग ढोल ताशे नगारे वाजवायला सुरुवात करायची. 

बाकी या अखंड भारताच्या भंपक,बाष्कळ,अव्यवहार्य मृगजळाच्या मागे धावणारे मंदबुद्धी आणि माठ लोक आहेत याची खात्री भागवत आणि कंपूला आहे म्हणूनच या पिचक्या पिपाण्या अधूनमधून वाजवण्याची उबळ त्यांना येते आणि त्या पिपाण्याना रणवाद्य समजून नसलेली छाती फुगवून ढोल वाजवायची उबळ भक्तांना येते.

आनंद शितोळे

#आपल्या_धडावर_आपलेच_डोके 

#अखंड_भारत

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा