पी.ए.इनामदार स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन साजरा

नगर - इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचालित पी.ए.इनामदार स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज गोविंदपुरा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र दिना निमित्त सकाळी झेंडावदनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळेस शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
यावेळी प्राचार्य फिरोसअली यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या समाजात  शिक्षणाच्या नवकल्पनां विषयी सखोल माहिती दिली. त्यांनी समाजासाठी उपयुक्त नवीन अभ्यासक्रम बाबत चर्चा केली, ज्यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक विषयावर काम करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत यांनी झाली. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. उपप्राचार्या फरहाना शेख यांनी मुख्य पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा