खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पेन्शनर्स चर्चासत्राचा समारोप

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राज्यातील इपीएस ९५ पेन्शनर्स पदाधिकारी यांचे राज्यस्तरीय चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यक्रमाचा शिर्डीतील पालखी निवारा सभागृहात शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मनोगताने संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत हे होते. दि.२६ एप्रिल रोजी अशोकराव राऊत, डॉ. पी. एन. पाटील, स.ना. आंबेकर, पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, देवीसिंग जाधव आदींच्या हस्ते श्री साईबाबा प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. दिवसभर राज्यातील पदाधिकारी यांची संघटनेला आलेले यश व संघटना बळकट करण्याविषयी, विविध विषयावर व्याख्यान, मनोगते झाली.व सर्वांचा सत्कार करण्यात आला. दिनांक २७ एप्रिल रोजी चर्चासत्र व जी.मंजुनाथ मिडिया प्रमुख कर्नाटक यांचे एक तास एलसीडीव्दारे स्क्रीनवर संघटना बळकटीसाठी पूर्ण प्रशिक्षण दिल्याने सर्वानाच मोठी प्रेरणा व स्फूर्ती मिळाली.
या विषयी अशोकराव राऊत म्हणाले की, जी. मंजुनाथ यांच्या माध्यमातून वारंवार अशी प्रशिक्षणे आणी चर्चासत्रे सर्वत्र झाली पाहिजेत.
सुभाष पोखरकर यांनी पेन्शनच्या अनेक रकमा खात्यावर असतात पण पेन्शनधारकांना त्या माहित नसतात. त्याचे सविस्तर विवेचन करून त्यांना  रकमा कशा मिळतील यावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव राऊत यांनी सांगितले की, केंद्रीय कामगार मंत्री यांनी बैठकीला बोलाविल्याप्रमाणे २१ फेब्रु.रोजी बैठक झाली व त्यात सांगितले की, आपले काम होत आहे सर्व पेन्शनर्स यांना सांगावे की मी तुमचे काम करीत आहे. सव्वा महिना झाला तरी अद्याप आदेश नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा हेमा मालिनी, राज्यमंत्री खा. प्रतापराव जाधव आणी इतर खासदारांना भेटून त्यांचेमार्फत १९ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाने आमंत्रण  दिले आहे की, पेन्शनधारकांचे साडेसहा वर्षापासून बुलढाणा येथे सुरु असलेले लोकांचे उपोषण महिन्यात आम्हाला तारीख देऊन पंतप्रधान यांचे हस्ते उपोषण सोडावे व लाखो पेन्शनधारकांच्या मेळाव्यात योग्य तो निर्णय पंतप्रधान यांनी जाहीर करावा तसेच असे भव्य मेळावे  यापूढे इतर ठिकाणी देखील घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दि.२७ एप्रिल रोजी समारोप प्रसंगी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले की, १५ वर्षापासून पेन्शनवाढीच्या प्रश्नावर शासनाला जाग येत नाही. अनेक वेळा आपल्या आंदोलनात दिल्लीसह सर्वत्र सहभागी झालो.अनेक खासदारांचे पाठबळ यासाठी मिळालेले आहे जुलै मध्ये होणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा राष्ट्रीय नेत्यांच्या माध्यमातून आम्ही मांडणार आहोत. त्यासाठी शिर्डी येथे भव्य मेळावे आयोजित करणार असून महत्वाचे मान्यवर येथे आमंत्रित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडूनच पेन्शनवाढीचा प्रश्न निश्चित मार्गी लावू असे आश्वासन खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी मेळाव्याचा समारोप प्रसंगी दिले.
यावेळी राज्यातील मान्यवर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपस्थित होते. यावेळी राज्यात विविध पदांवर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव राऊत यांनी केल्या व त्यांना नियुक्तीपत्र दिले.
यामध्ये नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट यांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी बढतीपर निवड करण्यात आली याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी देवीसिंगअण्णा जाधव, एस.एन. आंबेकर, पी. एन. पाटील, महिला राष्ट्रीय अध्यक्षा आरस, आशाताई शिंदे, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, भगवंत वाळके, दशरथ पवार, पंजा पाटील कोते, सुभाष आरसुले, अर्जुन जाधव कटारिया, अशोक देशमुख, सुलेमान शेख,किशोर शिंदे, पोपटराव सोनवणे,शिवाजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा