डी पी तयार करण्यासाठी ७ वर्षे घेतली आणि त्यानंतर तयार झालेला डी पी रद्द केला, ही पुणे जिल्ह्यातील नागरिकांची थट्टा आहे.अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप
राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने PMRDA चा DP रद्द करत पुणे जिल्हा बकाल करण्याचे ठरवले आहे. हा DP रद्द झाल्याने पुणे जिल्हा व परिसरातील नागरिकांचा विकासाचा हक्क राज्य सरकारने हिरावला आहे. PMRDA स्थापन होऊन २२ वर्षे झाली, तरीही पुण्याला DP मिळाला नाही. आताचा DP तयार करण्यासाठी ७ वर्षे घेतली आणि त्यानंतर तयार झालेला DP रद्द केला ही पुणे जिल्ह्यातील नागरिकांची थट्टा आहे. अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
यापूर्वी DP तयार करत असताना कारभाऱ्यांनी आशीर्वादाने नीलाहर नावाच्या ठेकेदारासह अनेक मध्यस्थांनी शेतकऱ्यांची व बिल्डरांची मोठी फसवणूक करत तब्बल ३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोपही प्रशांत जगताप यांनी केला, या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आज पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास माझ्यासह, स्वाती पोकले, अनिता पवार, दिलशाद अत्तार, आशाताई साने, शेखर धावड़े, फाईम शेख, पप्पु घोलप, योगेश पवार, अजिंक्य पालकर, सचिन कदम, विक्रम जाधव तथा पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق