पी ए इनामदार इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीचा 98 टक्के निकाल

अहमदनगर - इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या गोविंदपुरा येथील पी. ए.इनामदार इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थ्यांनी यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली शाळेतील 114 विधार्थांनी दहावीची परीक्षा दिली त्यापैकी 112 विधार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. व दहावी बोर्डाच्या मार्च 2025 च्या परीक्षेत शाळेचा निकाल ९८ टक्के लागला. यामध्ये शाळेचे विद्यार्थि शेख यासीन अंन्सार याने 92.60 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय शेख मदीहा समशेर 91.40, तृतीय शेख मोहंमद अफ्फान अंन्सार 88.60 टक्के गुण प्राप्त केले. 
या यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य फिरोसअली मराक्कटील, उप प्राचार्या फरहाना शेख तसेच संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, व्हा.चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी, खजिनदार डॉ. खालीद शेख, अकॅडमीक डायरेक्टर शब्बीर मोहंमद सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा