येवल्याच्या शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी डॉ माहेश्वरी गावित तर उद्घाटकपदी डॉ.कैलास दौंड यांची निवड

येवला प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्या साठी अध्यक्षपदी अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांची तर उद्घाटकपदी पाथर्डी जि. अहिल्यानगर येथील साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांची निवड झाली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ यांनी कळविले आहे.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कवी, लेखक, कथाकार यांच्या साहित्य कलाकृतीला राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार नुकतेच १ मे २०२५ रोजी जाहीर झाले आहेत. निवड झालेल्या कलाकृतीचा पुरस्कार प्रदान सोहळा येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे दि. ४ जून २०२५ रोजी संपन्न होणार आहे . या सोहळ्यासाठी शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानने अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांची तर अध्यक्षपदी तर उद्घाटकपदी पाथर्डी जि. अहिल्यानगर येथील साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांची निवड केल्याबाबत प्रतिष्ठाने पत्राव्दारे लेखी कळविले आहे.

मा. डॉ. माहेश्वरी गावित या आदिवासी साहित्य, लोकसाहित्य, आदिवासी भाषा यांच्या अभ्यासक, समीक्षक आहेत. सन २०१५ मध्ये नांदेड येथे भरलेल्या दहाव्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक शिबीर, मेळावे यात त्यांनी मार्गदर्शनपर प्रबोधनात्मक विचार, व्याख्याने दिली आहेत. त्यांची आदिवासी जीवनावर महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य :एक शोध, आदिवासी साहित्य विचार, आदिवासी विशेषांक, लोक साहित्य : जीवनकला असे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.
 मा. डॉ. कैलास दौंड यांची साहित्य संपदा मोठी आहे त्यांचे ६ कवितासंग्रह , ३ कादंबरी , १ कथासंग्रह, १ ललित लेख संग्रह तर ४ बालकुमार साहित्य अशा कलाकृती प्रकाशित आहेत. त्यांची गोधडी ही कथा महाराष्ट्रातील ई. ८ वीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमासाठी समाविष्ट आहे. डॉ कैलास दौंड यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची कापूसकाळ ही कादंबरी  मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. अभ्यासक्रमात आणि रामनिरंजन रुईया महाविद्यालय , माटुंगा, मुंबई च्या बी.ए.अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.  
डॉ माहेश्वरी गावित व डॉ. कैलास दौंड यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा