लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा दहावी उत्कृष्ट निकाल

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
नगर शहरातील अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ८८.७३ % लागला असून परीक्षेत एकूण ७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. प्रथम श्रेणीत ३८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १९ विद्यार्थी तर तृतीय श्रेणीत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. विद्यालयात कु.आश्लेषा विवेक गहाणडुले ९६.८० टक्के प्रथम, पवार मयूर शंकर ९२.२० टक्के द्वितीय, गहाणडुले अद्वैत विवेक ९५.८० टक्के तृतीय, एकशिंगे स्वराज बाळासाहेब ९४.६० चतुर्थ, गोरे अनुज जालिंदर ९३.२० टक्के गुण मिळवून पाचवा आला आहेत.
    या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि वर्गशिक्षक व विषय शिक्षकांचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, अभिषेक कळमकर, उत्तर विभागीय अधिकारी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नवनाथ बोडखे, माजी ऑडिटर प्राचार्य विश्वासराव काळे, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते, अंबादास गारुडकर, शामराव व्यवहारे, विष्णुपंत म्हस्के, मुख्याध्यापिका छायाताई काकडे, मुख्याध्यापक, आजीव सदस्य शिवाजीराव लंके संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक, विद्यार्थी, हितचिंतक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे, प्रभाकर थोरात, सुनिता लांडगे, अमित धामणे, मंगेश कारखिले यांचे  विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा