दत्तनगर व बेलापूर येथील घरकुल कॉलोनी राज्यात आदर्श ठरतील... घरकुल वसाहतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करूः नाम. विखे व नाम. गोरे यांची ग्वाही

श्रीरामपूर /  प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर व बेलापूर येथील नियोजित  घरकुल कॉलोनी राज्यात आदर्श ठरतील यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करु तसेच सदरच्या कॉलोनी पथदर्शक ठरतील यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामविकास मंञी नामदार जयकुमार गोरे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती नाना शिंदे व विद्यमान उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली.                                                           यासंदर्भात माहिती देताना श्री.शिंदे व श्री.खंडागळे यांनी सांगीतले की,दत्तनगर व बेलापूर येथील नियोजित घरकुल कॉलोनी पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचे सहकार्याने मंजुर आहे.या कॉलोनींसाठी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांनी  दत्तनगर येथील १५ एकर जमिन घरकुलांसाठी दिली आहे. तर बेलापूर येथील ३४ एकर  शेती महामंंडळाची घरकुलांसह घनकचरा प्रकल्प व अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी जागा विनामुल्य उपलब्ध करुन दिली आहे.या जागेवर नियोजित घरकुल कॉलनी साकारणार आहेत.            सदरच्या कॉलोनी मध्ये सौर उर्जा,पक्के रस्ते,पथदिवे, सांडपाण्यासाठी गटारी अशा विविध नागरी  सुविधांबाबत नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे पुढाकाराने नाम. जयकुमार गोरे यांचेशी त्यांचे मंञालयातील दालनात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.                                                              या  चर्चेदरम्यान नानासाहेब शिंदे यांनी सांगितले की, दत्तनगर ग्रामपंचायतीला मिळालेल्या जागे मध्ये एकूण १११ घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे.तेथे 'माय वन' पद्धतीने बांधकाम करण्यात येणार असून सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. घरकुल कॉलोनीतील प्रत्येक घराला सोलर सिस्टिम उपलब्ध करून दिल्यास त्याचा घरकुल धारकाला मोठा फायदा होणार आहे.यावेळी अभिषेक खंडागळे यांनी, बेलापूर येथील घरकुल कॉलोनी बाबत सविस्तर माहिती दिली. हरिहरनगर (रामगड) व गायकवाड वस्ती अश्या दोन ठिकाणी घरकुल कॉलोनी होणार असून या कॉलनीचे राधाकृष्ण नगर व सुजयनगर असे नामकरण करण्यात आलेले आहे. 
या कॉलोनीचे ले-आउट करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या ठिकाणी अंतर्गत रस्ते,गटारी, पाणीपुरवठा व्यवस्था करणे गरजेचे आहे.त्याच प्रमाणे बेलापूर-ऐनतपूर येथील अंतर्गत रस्त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी श्री. खंडागळे यांनी केली.सदरच्या चर्चेदरम्यान नाम.श्री.विखे पा. व नाम. श्री.गोरे यांनी नियोजित वसाहत कशी असावी,त्यात  कशाप्रकारच्या नागरी सुविधा असाव्यात यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
या कॉलनीसाठी ग्रामविकास विभागाकडून सोलर सिस्टिमचे टेंडर काढण्यात यावे जेणेकरून दर्जेदार व कमी किमतीमध्ये सोलर सिस्टिम घरकुल धारकांना उपलब्ध होतील अशी सूचना नामदार विखे पाटील यांनी मांडली.तसेच या नियोजित वसाहतीत नागरी सुविधा उभारण्यसाठी आणि सदर घरकुल वसाहती पथदर्शक ठरतील यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन दिले.सदरच्या चर्चेनंतर पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे सुचनेनुसार पालघर येथील जिल्हा परिषदेला भेट दिली.या भेटीदरम्यान सदरच्या जिल्हा परिषद राबवित आसलेल्या विविध लोकोपयोगी व ग्रामविकास उपक्रमांची माहिती घेतल्याचे श्री.शिंदे व श्री.खंडागळे यांनी सांगीतले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा