अहमदनगर स्थापना दिनानिमित्त संग्राहक सचिन डागा यांच्या दुर्मिळ नाणी, नोटा, स्टॅम्प व ठाकुरदास परदेसी यांच्या गडकिल्ले चित्रांचे प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद

दुर्मिळ वस्तू स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा योग येतो त्या उत्साहला व आनंदाला सीमा नसते- युनूसभाई तांबटकर 

नगर- शिक्षण घेत असतांना सर्व आपल्या शिक्षकांकडून इतिहासाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकत असतात. तसेच त्या काळातील दैनंदिन जीवनात वापरल्या जाणारे नाणी, तसेच सनदी, वस्तू, त्या काळातील बोल्या जाणाऱ्या वेगळ्या भाषा व त्यातील व्यवहार अशा अनेक बाबीबद्दल सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. जेव्हा या सर्व दुर्मिळ वस्तू स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचा योग येतो तर उत्साहला व आनंदाला सीमा नसते, असे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले.
मखदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन, इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने अहमदनगर शहराच्या 535 व्या स्थापना दिनानिमित्त रहमत सुलतान हाॅल सर्जेपुरा मध्ये सचिन डागा यांच्या दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टल तिकिट व नवीन चलनातील नाणी व नोटांचे प्रदर्शन तर गडकिल्ले भ्रमंती करणारे ठाकुरदास परदेसी यांच्या चित्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर,उर्जिता फाऊंडेशनच्या सौ. संध्या मेढे, क्वाईन संग्राहक सचिन डागा,गडकिल्ले अभ्यासक ठाकूरदास परदेशी,एमआयएम जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद शफकत,क्वाईन संग्राहक पंकज मेहेर, आर्किटेक्ट फिरोज शेख, जावेद मास्टर, जीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, फिरोज शेख आदी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनास नगरमधील सर्व इतिहास प्रेमी तसेच शहरातील  विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साह व कुतुहलाने प्रदर्शन पाहून संग्राहक सचिन डागा यांच्यावर या दुर्मिळ वस्तूंबद्दल प्रश्नांची बरसात केली. दोन दिवस मोफत प्रदर्शन लावल्याबद्दल सचिन डागा यांचा मखदुम सोसायटी व रहेमत सुलतान फाउंडेशन च्यावतीने सत्कार करण्यात आला.या प्रदर्शनात भारतीय संस्थानिक राजांचे स्टॅम्प पेपर, कोर्ट फी स्टॅम्प, स्वतंत्र भारतातील चलनी नाणी,स्मारके, शिक्के,ब्रिटीशकालीन शिके, मुगल राजांची नाणी, काश्मिरी राजांची नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी, अहमदनगर शहराच्या राजांची नाणी, खोटी नाणी, तांत्रिक चुकीची नाणी,ब्रिटीशकालीन नोटा, संस्थानिक राजांच्या नोटा, पोर्तुगीत नोटा, हैद्राबाद निजामाच्या नोटा, खादी हंडी नोटस्, स्वतंत्र भारतातील जुन्या व नवीन चलनातील एक-ते दोन हजारपर्यंतच्या नोटा, बगीनर स्टॅम्प संग्रह, पोस्टल स्टॅम्प संग्रह, सिट लेटस्, मिनिएचर शिटस् आदी ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार शफकत सय्यद यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा