शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी दुध उत्पादक आघाडीचे शिष्टमंडळाने मुंबईतील दुग्ध व्यवसाय मंत्रालयात सचिव डॉ. राधास्वामी एन. तसेच दुध विकास विभागाचे आयुक्त प्रशात मोहोड यांची भेट घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. दुधा ला सध्या मिळत असलेल्या दरामध्ये वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे या व्यवसायावर विपरीत परीणाम होत असुन शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी होऊन नैराश्याचा छायेत आहे.
राज्याला लागणा-या सरासरी दुध पुरवठ्यासाठी जे संघटीत व असंघटीत संघामधुन येणा-या दुधाची व मागणीमध्ये मोठी तफावत आहे व ही तफावत मोठ्या प्रमाणावर भेसळ करुन भेसळखोर पुर्ण करुन जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करीत आहे. सरकारचा याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा होत आहे,वारंवार मागणी करुनही अशा संघावर दुध भेसळ विरोधी पथकांची कार्यवाही होताना दिसत नाही व यासंबधीची माहीती विचारली असता याचा काहीही तपशील दिला जात नसल्यामुळे सदर पथकांमध्ये प्रत्येक तालुक्यामधुन किमान २ शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करावा अशी मागणीही यावेळी शिष्टमंडळाने केली.
सदर प्रश्नांना उत्तर देतांना डॉ. राधास्वामी एन. यांनी संबंधीत अधिकारी यांना तात्काळ आदेश देत अहिल्यानगर मधील परिस्थीतीचा ३ दिवसांमध्ये आढावा घेत यासंबंधीची माहीती सदर शिष्टमंडळाला द्यावी व अनुदानामध्ये काही वशीलेबाजी करुन फाईल मंजुरी आढळली तर तसा अहवाल मला ३ दिवसात सादर करावा, कोणताही मुलाहीजा न बाळगता सदर दोषी अधिका-यांना निलंबीत करुन मी गुन्हे दाखल करतो असे आश्वासन शेतकरी संघटनेचे दुध उत्पादक आघाडीचे अध्यक्ष सागर गि-हे, बाबासाहेब वेताळ, सचिन वेताळ,सुनिल आसने, गोरक्षनाथ वेताळ, बाळासाहेब वेताळ यांना यावेळी देण्यात आले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق