छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालय समर्थनगर येथे प्रसिध्द साहित्यिक तथा बँन्डमास्टर अय्युब पठाण लोहगावकर लिखीत " गोदाकाठचे गावकुस " या ललीत लेख संग्रहाचे प्रकाशन नुकतेच विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव शिसोदे पाटील उर्फ श्रीतात्या व संस्थेचे अध्यक्ष अक्षयभाऊ शिसोदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. यशोदभाऊ शिसोदे पाटील, उपाध्यक्ष अमरभाऊ शिसोदे, कोषाध्याक्ष तुषारभाऊ शिसोदे आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रभाकर मोरे यांची विशेष उपस्थिती होती. " गोदाकाठचे गावकुस " या लेखसंग्रहात धरणग्रस्त गावांची भौगोलिक माहिती असून तेथील लोकांचे राहणीमान, रुढी-परांपरा तसेच शेतशिवार यांची सखोल नोंद घेण्यात आली आहे. याप्रसंगी श्री.बी.आर. गायकवाड, विजय बोबडे, विशालभाऊ, मुदस्सर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर- गोदाकाठचे गावकुस" या ललीत लेख संग्रहाचे चे प्रकाशन करतांना (मध्यभागी) श्रीमंतराव शिसोदे पाटील, अक्षयभाऊ शिसोदे, डॉ. प्रभाकर मोरे, लेखक अय्युब पठाण लोहगावकर, विजय बोबडे आदी मान्यवर दिसत आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق