पितृसेवा करण्यात मनिषा रसाळचा आदर्श श्रावणबाळासारखा - सौ. आरती उपाध्ये

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मातृपितृ सेवा हा भारतीय संस्कृतीचा आदर्श असून संगमनेर येथील मनिषाताई रसाळ यांनी संसारबंधनात न गुंतवून घेता द.सा. रसाळगुरुजी आपल्या वडिलांची सेवा स्वीकारली, त्यांची पितृसेवा श्रावणबाळासारखीच आदर्श सांगणारी असल्याचे मत श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानच्या सचिव सौ. आरती गणेशानंद उपाध्ये यांनी व्यक्त केले.
  येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे मनिषाताई रसाळ यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मनिषाताई रसाळ यांच्या अनेक वर्षापासूनचा पितृसेवा धर्म आणि  रसाळ गुरुजींची स्वाध्यायी विचाधारा, लेखन, वाचन संस्कृतीची जपवणूक कशी केली, त्याबद्दल माहिती देऊन मनिषाताई रसाळ ह्या खऱ्या अर्थाने वंशदिवा होऊन पितृसेवा करीत असल्याची माहिती दिली. आरती उपाध्ये यांनी द.सा. रसाळगुरुजी आणि मनिषाताई यांचे पिताकन्या यांचे सेवानाते विशद केले. याप्रसंगी द सा. रसाळगुरुजींनी आपली लेक मनिषाताई यांचे सेवाभावी व्यक्तिमत्त्व आणि आदर्श गृहदक्ष कन्येचे प्रसंग सांगितले. मनिषाताई रसाळ यांनी आपल्या सत्काराबद्दल भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा. दिलीप सोनवणे, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांनीही मनिषाताई रसाळचे कौतुक केले. सौ.मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 956117411

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा