अहिल्यानगर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अकोले येथील बुवा साहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष आणि अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. रमेश (अण्णा) जगताप यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी शाल, पुष्पगुच्छ, खोबरे, खारीक, पुष्पहार आणि घड्याळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी अगस्ती स्विट होमचे संचालक संदिप मोरे, तसेच राजु अण्णा मन्ने यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रमेश अण्णा जगताप यांच्या सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला शुभाशीर्वाद दिले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق