पेन्शनर्स च्या सर्व संघटनांची १५ जुन रोजी पुण्यात बैठक

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दिनांक १५ जुन रोजी पेन्शनर्स च्या सर्व संघटनांची बैठक पुण्यात घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष एस. के. सय्यद यांनी दिली. 
नुकताच रविवार  दि. ४ मे २०२५ रोजी पुणे येथे झालेल्या इपीएस ९५ पेन्शनर संघटनेच्या मीटिंग मधे कम्युनिस्ट पेन्शनर संघटना, विदर्भ पेन्शनर संघटना, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी पेन्शनर संघटनेचे ज्येष्ठ नेते ॲड.  अतुल दिघे हे होते. यावेळी प्रमुख विषयावर साधक बाधक चर्चा झाली त्यात
पुढील प्रमाणे चर्चा करण्यात आली. 
सर्वानुमते देशपातळीवर २१ सदस्यांची कमिटी करण्यात येईल. प्रत्येक राज्याला एक प्रतिनिधित्व मिळेल.
कम्युनिस्ट संघटनेचे अस्तित्व स्वतंत्र राहील. महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना व विदर्भ मधील देवराव पाटलांची पेन्शनर संघटना एकत्रित काम करतील.१५ जून २०२५ रोजी पुणे येथे सर्व संघटनांची एकत्रित मीटिंग घेऊन केंद्र सरकार बरोबरच्या पेन्शनर संघर्ष लढ्याची तयारी करण्यात येईल. १ जुलै २०२५ रोजी  देवराव पाटलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकोला येथे इपीएस ९५  पेन्शनरांच्या भव्य मेळाव्याचे नियोजन करण्यात येईल.
या विषयावर चर्चा झाली. तेलंगणाचे ज्येष्ठ नेते  जनार्धन रेड्डी हे इपीएस ९५ पेन्शनरांचे देशपातळीवर आजीव अध्यक्ष असतील.
 या पुणे मीटिंगसाठी प्रकाश येंडे, भीमराव डोंगरे,पांडुरंग पांडे, नाशिकचे श्री. जोशी  तसेच ' महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स  संघटनेचे अध्यक्ष  सर्जेराव दहिफळे  उपाध्यक्ष  बाबुराव दळवी, सेक्रेटरी  आबासाहेब सोनवणे व संघटनेचे सदस्य एस. आर. लांडे व पुण्यातील सहकारी पेन्शनर मित्रासह उपस्थित होते. सर्व पेन्शनर संघटना यांना एकत्रित करण्याचे काम महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे जनरल सेक्रेटरी  सुभाष कुलकर्णी  यांनी केले. अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष एस. के. सय्यद यांनी दिली.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा