कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे रायगडावर स्वच्छता अभियान

सातारा / प्रतिनिधी:
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा राष्ट्रीय सेवा योजना विभाग  उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन  मुंबई  राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व व घटक महाविद्यालय यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगड या ठिकाणी स्वच्छता अभियान राबववनेत आले.  राष्ट्रीय सेवा योजनेमधील सर्व स्वयंसेवकांनी महाड येथील चवदार तळे परिसरातील स्वच्छता केली त्याचबरोबर बौद्ध लेणी महाड या ठिकाणी देखील स्वच्छता अभियान राबविले रायगड पायथ्याला विद्यार्थ्यांनी शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने जो घनकचरा निर्माण झाला होता त्याचे संकलन करून विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचे काम केले. प्लास्टिक बाटल्या प्लॅस्टिक पिशव्या व इतर वस्तू संकलित केल्या सुमारे ३५ प्लास्टिक मोठ्या कचरा बॅग संकलित केल्या. त्याचबरोबर रायगडावरती कार्यक्रमाच्या निमित्ताने हजर असणाऱ्या शिवप्रेमी कडून प्लास्टिक बाटल्या प्लास्टिक पिशव्या व इतर घनकचरा जो पडलेला होता तो संकलित करण्याचं काम विद्यापीठाच्या स्वयंसेवकाने केले खूप चांगल्या प्रकारचं काम या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले.सदर कामाबद्दल अपारंपारिक ऊर्जा मंत्री भरत गोगावले स्थानिक अधिकारी यांनी या केलेल्या कामाबद्दल कौतुक केले सदर कामासाठी विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय ज्ञानदेव मस्के कुलसचिव डॉ. विजय कुंभार  यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा चे प्राचार्य डॉ. बी टी जाधव यांनी सदर कामांमध्ये खूप मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा वित्त व लेखा अधिकारी धनाजी जाधव यांनी सदर कामे आर्थिक मदत केली. धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा चे प्राचार्य डॉ .गणेश जाधव  सदर अभियानाचे नियोजन विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे  प्रभारी संचालक प्रोफेसर डॉक्टर नंदकुमार माने यांनी केले.  त्यांना धनाजीराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी डॉ.. विजय पाटील यांनी सहकार्य केले या मोहिमेमध्ये एकूण  ४२ स्वयंसेवक विद्यार्थी  सहभागी झाले होते.
 सदर ठिकाणी केलेल्या कामाबद्दल कुलगुरू डॉ.  ज्ञानदेव मस्के, कुलसचिव डॉक्टर विजय कुंभार, डॉ. बी टी जाधव, डॉ. गणेश जाधव यांनी अभिनंदन व कौतुक केले.
*वृत्त विशेष सहयोग*
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे (सर) सातारा 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा