"सदैव सोबत असलेला विश्वासू सहकारी हेमंत कुसळकर उर्फ हरीश यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिल्या शुभेच्छा!"

*पंचवीस वर्षांची साथ, प्रत्येक यशात मोलाचा वाटा – असा शिल्पकार सहकारी मिळणं म्हणजेच आयुष्याचं खऱ्या अर्थाने भाग्य – डॉ.विश्वासराव आरोटे*

अकोले / प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच दैनिक समर्थ गांवकरी या समूहामध्ये गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले, कामामध्ये नेहमी पुढे आणि प्रसन्न चेहऱ्याने मदत करणारे, माझे उजवे हात, हेमंत कुसळकर उर्फ हरीश यांचा आज ३९ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या पंचवीस वर्षांपासून माझ्या प्रत्येक लढ्यात, संकटात, यशात, अपयशात, संघर्षात – एकच चेहरा सतत सोबत होता. तो म्हणजे हेमंत कुसळकर. कोणतीही अपेक्षा न ठेवता, नेहमी शांत, संयमी राहून समूहामध्ये काटेकोरपणे काम करणारा आणि कोणाच्याही भावना न दुखावता पुढे नेणारा हा खरा खंबीर आधारस्तंभ ठरला आहे.
जीवनात अनेकदा संघर्षाच्या क्षणी सर्वजण दूर जातात, मात्र हेमंत कुसळकर मात्र त्या क्षणी अधिक जवळ आले. समूहातील गोपनीय बाबी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळणारा, अनाठायी खर्च टाळणारा, संयमाचा आदर्श ठेवणारा आणि वेळप्रसंगी धावून येणारा – असा हा हरहुन्नरी छोटा भाऊ आज आपल्या ३९ व्या वर्धापनदिनात पदार्पण करतो, ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
या खास दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, मराठवाडा संपर्कप्रमुख पुंडलिक वाडेकर, दैनिक समर्थ गांवकरीचे वृत्तसंपादक निखिल भांगरे आणि व्यवस्थापक अमोल पुंडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन हेमंत कुसळकर यांचा सन्मान करण्यात आला.
“सुख येतील, दुःख जातील, परंतु माणुसकी आणि प्रामाणिकपणा या गोष्टी आयुष्यभर आपल्या सोबत असाव्यात” हा संदेश देणारा हरीश आपल्या प्रत्येक कृतीतून हे सिद्ध करत आहे.

तुमचं पुढचं आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी, यशस्वी आणि प्रेरणादायी ठरो, हीच मन:पूर्वक शुभेच्छा!

*प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा