विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य -प्राचार्य अर्जुनराव पोकळे.

भिंगार : तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात ही तुमची चूक नाही पण गरीब म्हणून जगणं ही खूप मोठी चूक आहे ,चांगलं शिक्षण घ्या आणि प्रामाणिक मार्गाने मार्गक्रमण केलं तरच तुम्ही या स्पर्धेच्या युगात टिकू शकतात असं प्रतिपादन अहमदनगर कॉलेजचे माजी प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अर्जुनराव पोकळे यांनी केलं. 
श्रीमती अॅबट मायादेवी गुरुदत्त हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज आणि विश्व शंकर प्राथमिक विद्यालय भिंगार या ठिकाणी नवागत विद्यार्थी स्वागत सोहळा सन 2025 26 आयोजन केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे माजी प्राचार्य अर्जुनराव पोकळे, विजय बेरड ,रमेश वराडे, शशिकला शेंडे ,उषा पांढरे रयत शिक्षण संस्थेचे   सहाय्यक विभागीय अधिकारी तथा प्राचार्य प्रमोद तोरणे मुख्याध्यापक नारायण अनभुले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले . 
संपूर्ण विद्यालय फुग्यांनी सजवलं गेलं छानश्या रांगोळ्या काढल्या गेल्या आणि विद्यार्थ्यांचं ऑप्शन करून त्यांना भेटवस्तू देखील दिल्या गेल्या शाळेच्या वतीने प्रभात फेरी देखील काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आलं. आसपासचा परिसर दुमदुमून गेला होता .                प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रमोद तोरणे म्हणाले की  येणाऱ्या वर्षभरात विद्यालयात अनेक उपक्रम घेतले जाणार आहेत यामुळे विद्यालय प्रगती पथावर जाईल                       ,ज्ञानदेव पांडूळे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा माधव रेवगडे आणि शिक्षिका क्रांति घायतडक यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक नारायण अनभूले यांनी मानले .

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा