अहमदनगर - नुकत्याच पार पडलेल्या विधी विभागाच्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे सदर विद्यार्थी - विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कर्मयोगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष शफि जहागिरदार यांनी हजरत मिरावली पहाड येथे स्नेह भोजन आयोजित केले होते. शिक्षण आणि कामासोबत सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने सदर विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
अॅड. सानिया नफिस चुडीवाला (एल एल बी)अॅड. अरीबा फ़ारुक शेख (एल एल बी)अॅड. नोमान अज़िम जहागिरदार ( एल एल बी) त्याचबरोबर १२ वी वाणिज्य विभागात, अहमदनगर महाविद्यालयात विशेष प्राविण्यासह प्रथम आलेली कु. निदा इकबाल चुडीवाला हिचा देखील सत्कार करण्यात आला.व झाडे भेट देण्यात आली.
याप्रसंगी शरद पवार होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रिज़वान अहमद, मिनर्व्हा इन्फ्राचे इंजि. अनिस शेख, नगरसेवक असिफ सुलतान,जेष्ठ विधीज्ञ फ़ारुक बिलाल,समाजसेवक नफ़िस चुडीवाला, जी.ए. एजन्सी चे अज़िम जहागिरदार, डॉ.रेश्मा रिज़वान, अॅड. साजिया सय्यद, जोधपूर येथून आलेले हैदर अली उपस्थित होते.
कर्मयोगी प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सदस्य जेष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. एम् के शेख यांनी सर्व यशवंताना पारितोषिक देऊन प्रोत्साहन दिले.
إرسال تعليق