ऋणानुबंध ची शनिवारी एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन लाईव्ह संगीत संध्या‘लेकर हम दिवाना दिल’ चे आयोजन

नगर - शहरातील सामाजिक आणि सांगीत क्षेत्रातील नावाजलेली संस्था ऋणानुबंध बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने शनिवार २८ जून 2025 वाद्यवृंदासह "लेकर हम दिवाना दिल" या लाइव्ह म्युझिक संध्येचे सावेडी येथील माऊली सभागृह येथे संध्याकाळी ५-३० वाजता आयोजन केले आहे.
'ऋणानुबंध' अनेक सामाजिक आणि सांगितीक उपक्रम राबवत असते. यावेळी नामवंत संगीतकार एस.डी. बर्मन आणि आर.डी. बर्मन यांच्या गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रासह मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. बर्मन पितापुत्रांनी संगीतबध्द केलेल्या अनेक अजरामर गीतांची मेजवानी 'ऋणानुबंध' चे कलाकार सादर करणार आहेत. तेरे मेरे मिलन की ये रैना, हम दोनो दो प्रेमी, कांची रे कांची रे, भीगी भीगी रातो मे, जय जय शिव शंकर, जानु मेरी जान, यम्मा यम्मा, कोरा कागज था ये मन मेरा इत्यादी गाजलेली गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत.
या कार्यक्रमात अजित रोकडे, डॉ. दमन काशिद, प्रशांत बंडगर, महेश घावटे, डॉ. शैलेंद्र खंडागळे, डॉ. विवेकानंद कंगे, सारंग पंधाडे, अजय आदमाने, भानुदास महानुर, चारुदत्त ससाणे, संजय भिगारदिवे, सारिका रघुवंशी, प्रतिभा साबळे, सीमा रघुवंशी, मोनाली बोरुडे, डॉ. गायत्री कुलकर्णी इत्यादी कलाकार गीते सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रायोजक शिंगवी ज्वेलर्स, माधवबाग साईमाऊली हॉस्पिटल, डॉ. दमन काशीद हॉस्पिटल, स्नेहदीप हॉस्पिटल, साताळकर लोटस, झेंडे हॉस्पिटल हे आहेत.
हा कार्यक्र प्रेक्षकांना विनामुल्य पाहता येणार असुन उपस्थित प्रेक्षकांना माधवबाग कडून विविध चाचण्यांवर डिस्काउंट कुपन दिले जाणार आहे. काही भाग्यवान प्रेक्षकांना लकी ड्रॉ मधुन पैठण्या दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या पासेस साठी कृपया - 9420635096 / 9823811119 / 7350881515 / या क्रमांकावर फोन करावा असे आवाहन ऋणानुबंध चे सदस्य सचिव सचिन परदेशी यांनी केले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा