अहमदनगर - सेवा निवृत्त शिक्षक, शशिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणुक पेन्शन अदालतमध्ये करण्यात यावी.
सेवानिवृत्त पात्र निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी यांची यादी पंचायत समिती स्थरावर प्रसिध्द करण्यात येऊन हरकती नोंदवुन, फरक अदा करावा. तसेच संघटनेस प्रत्येक तालुका स्तरावरील यादी मिळावी.१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२५ अखेर सेवानिवृत्त झालेल्या, परंतु गटविमा अद्याप पर्यंत अदा न केलेल्या शिक्षकांची नावे त्रुटीसह संघटनेस द्यावीत, तसेच ज्यांचे गटविमा अदा केला आहे त्यांची यादी व रक्कम जमा केल्याचा दिनांक व नमूना नं. ११ संबंधित सेवानिवृत्त शिक्षकास मिळावा, सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांचा ७ व्या वेतन आयोगातील हप्ते त्वरीत अदा करण्यात यावेत,प्रा.फंड, पेन्शन विक्री व ग्रॅज्युईटीच्या रकमा सेवा निवृत्तीनंतर त्वरीत अदा कराव्यात, संगणकाची कपात केलेली रक्कम शासनाकडे मागणी करण्यात यावी व तसे मागणीचे पत्र संघटनेस द्यावे,
सेवानिवृत्त शिक्षकांना ओळखपत्र देण्यात यावेत, सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन दरमहा १ ते ५ तारखेच्या दरम्यान करण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षकांसाठी पेन्शन अदालत दरमहा तालुका व जिल्हा स्तरावर नियमितपणे घेतली जात नाही. तसेच मागील अदालतीचे इतिवृत्ता नुसार प्रश्नांची सोडवणुक झालेली दिसून येत नाही. तरी अदालतीमध्ये झालेल्या सर्व विषयांची सोडवणुक करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा-अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दिलीप दहिफळे, कार्याध्यक्ष शरफुद्दीन शेख, सरचिटणीस सुनील जाधव, नेवासाचे अध्यक्ष योसेफ मकासारे, उपाध्यक्ष अशोक बडे, संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना जवळी जामखेडचे दशरथ हजारे, संचालक ज्योती क्रांतीचे विष्णू दादा हजारे, पाराजी झावरे, तुकाराम ठाणगे, मधुकर शिंदे,पांडुरंग घोडके, जगन्नाथ खामकर,ज्ञानदेव ढाकणे आदी उपस्थित होते.यावेळी सर्व विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी चर्चाही करण्यात आली.
إرسال تعليق