छत्रपती शिवाजी विद्यालयात नवगतांचे प्रवेशोत्सव उत्साहात

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नवीन वर्षाची सुरुवात नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कार अशा त्रिवेणी संगमाने करण्यात आली. सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुधीर पाटील कसार हे होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
 या कार्यक्रमासाठी थोर देणगीदार उद्धवराव पवार तथा आबा हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देऊन करण्यात आली.
विद्यालयात एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी स्मिता अशोक शिंगटे, रूपाली अशोक भोंडगे व तृष्णा सोमनाथ सोनवणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतातून सुधीर  कसार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संतोष नेहुल यांची बदली झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार, शितल निंभोरे, स्वेजल रसाळ, संतोष नेहूल, उषा नाईक, दिपाली बच्छाव, अविनाश लाटे, सुहास पांडे, प्रशांत बांडे, संदीप जाधव व भास्कर शिंगटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कसार यांनी केले तर भास्कर सदगिर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा