गाता रहे मेरा दिल, स्वरछंद ग्रुप व मख़दुम सोसायटी तर्फे कर्तुत्वान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

अहमदनगर - आज समाजामध्ये जो तो स्वताच्या जिवना मध्ये सुख शांती साठी झटत आहेत.परंतु समाजातील इतरांसाठी धडपड करणारी माणसे फार कमी बघायला भेटतात. अश्या दुर्बल घटकांसाठी त्यांच्या जिवनात सुख शांती व समृद्धी साठी समाजातील सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सहसचिव व आंतरराष्ट्रीय शायरा डॉ कमर सुरुर यांनी केले.
गाता रहे मेरा दिल ग्रुप, स्वरछंद ग्रुप व मखदूम सोसायटीच्या वतीने शहरातील कर्तृत्ववान  महिलांचा सन्मान सावेडी येथील माऊली सभागृहात करण्यात आला. या प्रसंगी डॉ. कमर सुरूर बोलत होत्या. यावेळी स्मिता ताई पानसरे,सुफी गायक पवन नाईक, उर्जिता  फाउंडेशनच्या संध्याताई मेढे,  जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे, रहमत सुलतान फाउंडेशनचे युनुस भाई तांबटकर, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संजय सपकाळ, संगीतप्रेमी अमृत मुथा, एडवोकेट रवींद्र शितोळे, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, एडवोकेट संतोष गायकवाड, मुस्कान असोसिएशनचे शफकत सय्यद, राजकुमार गुरनानी, एड. अमीन धाराणी, शिल्पकार विकास कांबळे, सुनंदा तांबे,एड. गुलशन धाराणी, डीसीबी बँकेचे सुरज सय्यद, नागेबाबा मल्टीस्टेटचे श्री कदम, संजय गाडे, सेलिंग किचनचे राहुल कुकरेजा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वंचित व दुर्बलांसाठी नेहमी कार्य करणाऱ्या अलका मुंदडा,रजनी मनोज भंडारी, राजश्री शितोळे, अँड. मनिषा केळगंद्रे - शिंदे, शबाना शेख, भारती शेवते, भावना केदार, रेश्मा आठरे, जागृती ओबेरॉय, रचना काकडे - तौर, एड.स्वाती जाधव, सलोनी जाधव, रविना कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुस्तक पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले. व या सन्मानार्थींच्या सन्मानार्थ सुरेल गीतांची महफील आयोजित करण्यात आली. यामध्ये नगरच्या हौशी कलाकारांनी रसिकांना आपल्या स्वर व गीतांनी मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सन्मान व गीतांना रसिकांनी वाह... वाह.. व टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या कार्यक्रमासाठी संध्याताई मेढे, राजकुमार गुरनानी व आबीद दुलेखान यांचे विशेष सहकार्य मिळाले. 
पुढे बोलताना डॉ कमर सुरुर म्हणाल्या की समाजात नेहमीच पुढे पुढे राहणाऱ्या लोकांचा व फक्त आपल्या नाव व चर्चेसाठी काम करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सन्मान होत असतो. परंतु जे खऱ्या अर्थाने मनाने समाजात वंचित, दुर्बलांचं विकास व्हावा या भावनेतून काम करणाऱ्या महिलांचा सन्मान या ग्रुप तर्फे करण्यात आलं ही कौतुकास्पद बाब आहे असे नमूद केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपा माळी व विजय माळी यांनी केले. तर आभार आबिद खान यांनी मांनले.
कार्यक्रमास नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा