पुणे - गेल्या ११ वर्षांपासून देशात RSS प्रणित सरकार असल्यामुळे "संविधान बदल" या RSS च्या ध्येलाला गती प्राप्त होत आहे. सरकारचे हे अभय असल्यामुळेच काही दिवसांपूर्वी पुणे शहरात "संविधान का बदलावे?" या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले.
सदर पुस्तकाच्या प्रकाशनास केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निर्बंध केला. मात्र तरीही हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला, हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
सरकार पुरस्कृत या संविधान विरोधी कृतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे पक्षाच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान विरोधी प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करत अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या पवित्र संविधानाच्या प्रतींचे नागरिकांना मोफत वाटपही करण्यात आले.
प्रशांत जगताप यांनी पुणे शहरात झालेल्या संविधान विरोधी पुस्तक प्रकाशनाचा निषेध व्यक्त करत महायुती सरकारने अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी केली.
या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्यासह माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर, शेखर धावडे, नरेश पगडाल्लु, अनिता पवार, पायल चव्हाण, श्रध्दा जाधव, सुनिल माने, फईम शेख, किशोर कांबले, दिल्शाद आत्तार, अजिंक्य पालकर, वसुधा निरभवने, रूपाली शेलार आदी पदाधिकारि व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق