क.जे.सोमैया हायस्कूल मध्ये शिक्षक पालक सहविचार सभेला पालकांचा मोठा प्रतिसाद

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 हिंद सेवा मंडळाच्या येथील क.जे. सोमैया हायस्कूल मध्ये इ.५ वी ते इ. १० वी च्या शिक्षक व पालकांची सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 
या सभेच्या अध्यक्षस्थानी सी.डी.जैन कॉमर्स कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.गोरख बारहाते होते. प्रमुख मान्यवर विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, ज्युनिअर विभागाचे जितेंद्र अग्रवाल, प्रशासकिय अधिकारी बी.एस.कांबळे, शंभुक विद्यार्थी वसतीगृहाचे अधिक्षक अशोक दिवे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे होते. 
या सभेमध्ये पालक - शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी भूषण गोपाळे, उपाध्यक्ष अशोक दिवे, सचिव अनिल चोभे, सहसचिव मंजुषा गायकवाड यांची निवड करण्यात आली. पर्यवेक्षक कल्याण लकडे यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, भौतिक सुविधा, स्पर्धा परिक्षा या बाबत माहिती दिली. विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड यांनी मार्गदर्शन केले व पालकांच्या मोठ्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. 
अशोक दिवे यांनी पालकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गोरख बारहाते यांनी मुलं आयुष्याची संपत्ती आहे. मुलांची योग्य वाढ करावी, मुलांना मोबाईल पासुन दुर ठेवावे, शैक्षणिक उपयोगासाठीच मोबाईल  वापर असावा. पालक - शिक्षक संवाद असावा. मुलांना मन मोकळे करण्याची संधी द्यावी. पाल्याचा कल पाहुन त्याला प्रोत्साहन द्यावे, मुलांशी सुसंवाद असावा असे सांगितले. या सभेस महिला पालकांची संख्या लक्षणीय होती. 
यानिमित्ताने विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश धोंडलकर यांनी केले. आभार रुपाली केवल यांनी मानले. पालक - शिक्षक सहविचार सभा यशस्वीतेसाठी संतोष सोले, विनायक चितळकर, श्रीराम कुलकर्णी यांसह सर्व वर्ग शिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी प्रयत्नशील होते.

*वृत्त विशेष सहयोग*
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा