नगर - युनेस्कोने नुकतेच महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत केला आहे. याचे औचित्य साधून पंडित नेहरू हिंदी विद्यालयात एकूण १२ किल्ल्यां वरील छायाचित्रांचेप्रदर्शन आयोजित केले आहे.
आजही ३५० वर्षानंतर छ. शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे सर्व किल्ले यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते. यामुळे जगामधील अनेक देशांना छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम नव्याने माहिती होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, खांदेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग व तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
अहिल्यानगरमधील ठाकूरदास परदेशी यांच्या नजरेतून विविध अंगांनी काढलेले हे फोटो अत्यंत आकर्षक आहेत. येत्या शुक्रवार दिनांक 15/08/2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत पंडित नेहरू हिंदी विद्यालय , एल.आय.सी. ऑफिस जवळ, किल्ला मैदान, अहिल्यानगर येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत राहणार आहे. तरी शिवप्रेमी नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यास विसरू नये अशी विनंती शाळेतर्फे करण्यात आली आहे.
Post a Comment