आळंदी (प्रतिनिधी) : “आदर्शवत साहित्य निर्माण करण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न केले पाहिजेत,समाजाला आनंद देणारे सकस साहित्य निर्माण झाले तर साहित्यिकांप्रती समाजही मोठी संवेदनशीलता बाळगतो.चिचोंडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राजेंद्र चौभें यांनी सामाजिक उत्तरदायित्व दाखवून दिले आहे,त्यांच्या कार्यकर्तुत्वाची दखल राज्यस्तरीय साहित्य संवाद घेण्यात आली,” असे प्रतिपादन उद्योजक फकीरा पवार यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आळंदी येथे आयोजित दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.राजेंद्र चौभें यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्य्माचे वेळी विचारपिठावर पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे, डॉ.कमलकांत वडेलकर, किसनराव घुले, शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना उद्योजक फकीरा पवार म्हणाले की, आपण खूप खडतर आयुष्य सोसून उभे राहिलो, आपल्याला घडवण्यासाठी आपल्या आई ने खूप काबाडकष्ट केले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी संयम ठेवून सतत कार्यरत योग्य नियोजन करा व मोठी स्वप्ने पहा,एक आदर्शवत सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. शब्दगंध सोबत आपण जोडले गेलो आहोत,ही चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी बोलताना ह.भ.प.गोरक्षनाथ महाराज उदागे म्हणाले की,समाजाला भौतिक आणि मानसिक दृष्ट्या सुधारण्याचे काम सर्वच संतांनी केले असून बंधुता, प्रेमभाव प्रस्थापित करून ऐक्याची शिकवण दिली यावरूनच संत साहित्याची समाजाप्रती उपयोगिता लक्षात येते.डॉ. कमलकांत वडेलकर बोलताना म्हणाले की, शब्दगंधची चळवळ आपण खूप जवळून पाहिली असून सुरुवातीच्या काळापासून आपण त्यांच्यासोबत आहोत, शब्दगंध ने आज आधुनिकतेचा विचार मांडला आहे,तो खऱ्या अर्थाने नव महाराष्ट्राला गती देणार आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना राजेंद्र चोभें पाटील म्हणाले की, श्री क्षेत्र नेवासा ते आळंदी हा अमृतानुभव मराठी भाषेला अधिक समृद्ध करणारा आहे, शब्दगंध करीत असलेले कार्य महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी आळंदी हे ठिकाण निवडले आणि या माध्यमातून ही चळवळ मोठी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे,अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी शब्दगंध साहित्य संवाद कार्यक्रमाची संकल्पना मांडली व ती शब्दगंधच्या कार्यकारी मंडळांनी यशस्वी करून दाखवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर प्रा.डॉ.अनिल गर्जे, बबनराव गिरी,राजेंद्र फंड, भगवान राऊत, मकरंद घोडके, प्रशांत सूर्यवंशी,राजेंद्र पवार, निखिल गिरी, भाग्यश्री राऊत, दिशा गोसावी, हर्षली गिरी, ऋषिकेश राऊत, स्नेहल रूपटक्के आदींनी प्रयत्न केले. मान्यवरांच्या हस्ते श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, दिगंबर गोंधळी, शिवाजी थिटे,प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.डॉ.श्रुतिका कानडे यांनी कथक नृत्यद्वारे गणेश वंदना सादर केली.राज्यस्तरीय शब्दगंध पुरस्कार उद्योजक नानासाहेब शेळके,पुणे, लेखक मारुती खडके,चिचोंडी, कवी विठ्ठल वरसमवाड,नांदेड, सामाजिक कार्यकर्ते शिरीष थोरवे,आष्टी यांना प्रदान करण्यात आले.त्यानंतर बाळासाहेब देशमुख यांचे कथाकथन झाले.
Post a Comment