नगर - इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड स्पर्धेत उस्मान रिजवान खान हा महाराष्ट्रात प्रथम आला आहे. त्याला ट्रॉफी, सर्टिफिकेट व 1200 रुपये रोख देऊन विद्यालयातील कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
उस्मान हा व्हॅल्यू व्ह्यू या इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. पत्रकार सरवर तांबटकर यांच्या भाच्याचा तो मुलगा आहे.
उस्मानच्या यशाबद्दल त्याचे खासदार निलेश लंके, डॉ. इकराम खान, डॉ. एम. के. शेख, डॉ. रंगनाथ सांगळे, नगरसेवक भाऊ उनवणे, बाळासाहेब बोराटे आदींनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment