आक्रमने निर्भीडपने थांबविण्याची जबाबदारी लेखक, कविंची - प्रा.डॉ. मिलिंद कसबे

नगर -(प्रतिनिधी) : “सद्या आपला समाज सांस्कृतिक संघर्षाच्या पार्शवभूमीवर उभा आहे. आपले गमवलेले सांस्कृतिक प्रभूत्व पुन्हा मिळवण्यासाठी आता लेखक, कवी, कलावंत आणि विचारवंत यांनी अधिक प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे.भाषा, संस्कृती, साहित्य, कला, अशा साऱ्याच क्षेत्रात होणारे आक्रमने निर्भीडपने थांबविण्याची जबाबदारी लेखक, कविंची आहे. यासाठी बोलीभाषा, मातृभाषा यांचा विकास होणे महत्वाचे आहे. जेव्हा जनभाषा ज्ञानभाषा होते तेव्हा शोषक आणि शासकाची सांस्कृतिक गुलामी नाहीशी होते.”असे प्रतिपादन समीक्षक,लेखक  डॉ.मिलिंद कसबे यांनी केले. 
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आळंदी येथे आयोजित दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र चौभें, उद्योजक फकीरा पवार,डॉ.जी.पी. ढाकणे, डॉ.अशोक दौंड,चंद्रमणी इंदुलकर, डॉ.किशोर धनवटे,अड्. अशोक जाधव,वरिष्ठ तुरुंगाधिकारी रेवणनाथ कानडे,डॉ.कमलकांत वडेलकर,शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि, लेखक,कलावंत हेच समाजाचा श्वास असतात,हा श्वास मोकळेपणी टिकून राहणे आवश्यक आहे.तरच समाज निकोप राहू शकतो.लेखक,कविनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून लेखन करायला हवे. यावेळी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. 
यावेळी शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केलेल्या काव्य संमेलनात रामदास कोतकर, लक्ष्मीकांत तरोटे,सरला सातपुते, सुमेध ब्राह्मणे,स्वाती राजेभोसले, स्नेहा पाठक,डॉ. विनय पिंपरकर, गोकुळ गायकवाड,रूपचंद शिदोरे, डॉ.प्रभा अंभोरे,बाळासाहेब गिरी,निरु जगताप, स्वाती काळे,दिलीप कापसे,सुरेखा घोलप,श्यामा मंडलिक,वृषाली आठवले, सुयश वाघमारे,क्रांती करंजगीकर,दुर्गा कवडे,प्रबोधिनी पठाडे,स्वाती अहिरे,साहेबराव तुपे,अमोल गोसावी,राहुल शिंदे, रुपचंद शिदोरे, ऋषिकेश राजगुरू..पी.एन. डफळ, समृद्धी सुर्वे,हेमांगी बोंडे,प्रशांत सूर्यवंशी,दिगंबर गोंधळी,दिपक पावसे,वैभव धस,वसंत डंबाळे यांनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.
      समारोप समारंभाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले तर शेवटी राजेंद्र फंड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अनिल गर्जे, बबनराव गिरी, भगवान राऊत, राजेंद्र पवार, निखिल गिरी, भाग्यश्री राऊत, दिशा गोसावी,श्रुतिका कानडे, हर्षली गिरी,ऋषिकेश राऊत, स्नेहल रूपटक्के,हौसीनाथ बोर्डे, शर्मिला रणधीर,आरती गिरी,प्रवीण मोरे, रिबिका ससाणे,अनिता कानडे आदींनी प्रयत्न केले.शाहिर भारत गाडेकर यांना पाथर्डी येथील सुवर्णयुग कलारत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल व डॉ. श्रुतिका कानडे हिने उद्घाटन कार्यक्रमात कथ्थक नृत्य सादर केल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सी.ए.दिपक चौधरी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा