नगर - शहरातील एसएमपी इंटरियर डिझाईन असोसिएट ऑफिसचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. या व्यवसायात तब्बल आठ वर्षांपासून कार्यरत असलेले संचालक सईद पठाण यांनी आता पर्यंत अनेक बंगले, फ्लॅट्स, हॉटेल्स, मंगल कार्यालये तसेच विविध वास्तूंचे आकर्षक डिझाईन करून यश मिळवले आहे.
उद्घाटन सोहळा सईद पठाण यांच्या मातोश्रींच्या शुभहस्ते रिबीन कापून संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सईद पठाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री.दराडे, उपजिल्हाधिकारी सय्यद वसीम,हाजी करीमशेठ हुंडेकरी, एन आर लाॅनचे हाजी नजीर अहमद,न्यु मॉडर्न कन्सट्रक्शनचे इकबाल सय्यद,केअर एन क्युअर हॉस्पिटलचे डॉ. सईद शेख, कॉन्ट्रॅक्टर चांद शेख, अब्दुल सलाम भाई,सय्यद परवेज, मदरसा आलमगीरचे हाफीज हाजी रीयाज, कॉन्ट्रॅक्टर उस्मान इनामदार, कॉन्ट्रॅक्टर रफिक भाई, फिरोज जहागीरदार, कवीजंग लॉनचे वसीम भाई, हाजी मिर्झा,अर्शद भाई, मतीन भाई तसेच या सोहळ्यास बांधकाम क्षेत्रातील इंजिनीयर, आर्किटेक्ट, कांन्ट्रॅक्टर, डॉक्टर, नगरसेवक, पत्रकार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी केअर एन क्युअर हॉस्पिटल चे डॉ.सईद शेख म्हणाले की, आजच्या युगात इंटेरियर डिझाईन ही केवळ सजावट नसून ती जीवनशैली बदलणारी संकल्पना ठरते. सईद पठाण यांनी या क्षेत्रात केलेले काम प्रेरणादायी असून पुढेही समाजाला उत्कृष्ट सेवा मिळेल याची खात्री आहे असे नमुद केले. उपस्थितांचे मतीन भाई व अर्शद भाई यांनी आभार मानले. आणि समाजास उत्तम व दर्जेदार डिझाईन सेवा पुरविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
Post a Comment