नगर (प्रतिनिधी) : "मानवी मनाला जोडण्याचे काम साहित्य करते, छोट्या मोठ्या संमेलनातून यास गती येते, आळंदी येथे झालेल्या शब्दगंध च्या साहित्य रसात सर्व साहित्यिक डुंबले असून त्याचा प्रत्यय आजच्या सभेत येत आहे. यावरून मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे", असे मत प्रसिद्ध उद्योजक प्रमोदजी बुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्य संमेलन यशस्वी झाल्याबद्दल वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये पार पडलेल्या आभार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे हे होते. तर विचारपीठावर संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, माजी प्राचार्य डॉ.जी पी ढाकणे, राजेंद्र चोभे, भगवान राऊत इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "शब्दगंध च्या वतीने विविध सामाजिक,साहित्यिक उपक्रम अहिल्यानगर शहरात होत असतात, यावेळी आळंदी येथे कार्यक्रम घेऊन शब्दगंधने आपल्या कार्याचा ठसा जिल्हयाबाहेर उमटवला आहे. याचा नगरकर म्हणून मला सार्थ अभिमान आहे.आता आम्ही शब्दगंध सोबत जोडले गेले असून इतर सर्व कार्यक्रमाला सहकार्य केले जाईल".
यावेळी बोलताना राजेंद्र चोभे म्हणाले की,शब्दगंधने ज्येष्ठ सभासद म्हणून मला कार्यक्रमाचे अध्यक्ष केले, माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असून त्याबद्दल सर्व सभासदांचे जाहीर आभार.
अशा प्रकारचे कार्यक्रम मधून मधून होत राहावेत अशी सर्व सभासदांनी इच्छा व्यक्त केली. यावेळी भगवान राऊत, मकरंद घोडके, प्रशांत सूर्यवंशी, प्रा.डॉ. अशोक कानडे, माजी प्राचार्य डॉ.जी.पी ढाकणे,ज्ञानदेव पांडुळे,प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, सुरेखा घोलप, शाहीर भारत गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वाती ठुबे,सुजाता पुरी, श्यामा मंडलिक,स्वाती अहिरे, मारुती सावंत,बबनराव गिरी यांनी आपल्या रचना सादर केल्या. तर बाळासाहेब देशमुख यांनी छोटी कथा सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर शेवटी प्रा.डॉ.अनिल गर्जे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षली गिरी,शर्मिला रणधीर, संगीता गिरी, मारुती खडके यांनी विशेष परिश्रम घेतले.
إرسال تعليق