न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार विद्यालया च्या तीन विद्यार्थ्याची तायक्वांदो स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

अजीजभाई शेख / राहाता 
रयत शिक्षण संस्थेच्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालातील तीन विद्यार्थ्यांची तायक्वांदो या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड झाली. प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर या ठिकाणी नुकत्याच तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला यामध्ये कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील १४ वर्ष वयोगट प्रेम संदीप कोरडे द्वितीय, १७ वर्षे वयोगट शौर्य संदीप कोरडे - प्रथम,  आयुष्य संदीप मेनगर - प्रथम, १९ वर्षे वयोगट सोहम सतीश कानडे - प्रथम, या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन करून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.  त्यांची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या तायक्वांदो स्पर्धेसाठी करण्यात आली या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दीपक मगर, शुभम पवार, विलास गभाले यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य अंकुशराज जामदार, उपप्राचार्य सिताराम बोरुडे, पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.अरुण कडू पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. अॕड. सुरेन्द्र खर्डे पाटील,जनरल बॉडी सदस्य मा.रावसाहेब म्हस्के पाटील, सदस्य सर्वश्री अजीत मोरे, श्री बी.के.खर्डे, पा.श्री संतोष थेटे पा., योगेश कोळपकर, पांडूरंग देवकर पाटील, संजय शिंगवी, विभागीय अधिकारी बोडखे साहेब. सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी साहेब, तोरणे साहेब  तसेच सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजमोहम्मद शेख - कोल्हार 

*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा